संस्कारक्षम भावी पिढी | Best marathi poem on aaji 2023

संस्कारक्षम भावी पिढी | Best marathi poem on aaji 2023

सौ. रोहिणी अमोल पराडकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi poem on aaji विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi poem on aaji

काव्यबंध समूह
काव्यलतिका
स्पर्धासाठी
दिनांक:- १४/०९/२०२३
विषय :- आजीची छकुली

संस्कारक्षम भावी पिढी | marathi poem on aaji

Best marathi poem on aaji 2023

ए आजी ग आजी
मी तुझी लाडाची नात
आवडती बेसन लाडू फार
दोन लाडू मैत्रीणीला दे डब्यात

आजोबा माझे आजोबा
शाळेला झाला उशीर
वेणी घाला केसांची
आता धरवत नाही धीर

आई ताई बघ ना ….
आजी आजोबा करतात
सकाळ संध्याकाळ पूजा पाठ
प्रत्येक कामात मदतीचा हात

आजी आजोबांची मिळते माया
नशीबवान आहे मी छकुली बाबा
आजी आजोबांचे संस्कार प्रभावी
दिवे लागणीला म्हणती घरी थांबा

आजी आजोबांचा लळा छकुलीला
सतत फिरते अवतीभोवती
शाळेतल्या गमंती सांगते साऱ्या
तिच्या संगे खेळण्यास मैत्रिणी जमती

आजोबा आजी रमतात
माझ्यासंगे भातुकलीच्या खेळात
गमंती जमंती करून
मला खूप खूप हसवतात

सौ.रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर

marathi poem on aaji

marathi poem on aaji

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *