अभिमान | best Marathi Poem on Fighter in 2024

सौ. माया मुत्यलवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Poem on Fighter in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Marathi Poem on Fighter in 2024

काव्यबंध समूह आयोजित उपक्रम,काव्यलतीका

रविवारीय काव्य स्पर्धा
२५२०२४
विषय
सैनिकांसाठी कविता

अभिमान | Marathi Poem on Fighter in 2024

भारत मातेचे रक्षण करण्या
सैनिक झटले या देशाचे
तत्पर असतात नेहमीच
आहेसच मोठ्या मनाचे

रक्षण करणे कर्तव्य त्यांचे
उभा ठाकला तो सीमेवर
घालून डोळ्यात तेल
गोळी झेलीत छातीवर

जनतेचे रक्षक होऊनी
शत्रूचा करी सदैव राग
लोकसेवेसाठी घेतला
सदैव त्यांनी आपला भाग

घरदार नाती सोडूनीया
सज्ज राहतो नेहमीच
स्वतःचा विचार सोडला
कमीपणा घेतला नाहीच

भूदल, नौदल, वायुदल
सेना मोठ्या आहेतच
भारतीय सैनिक म्हणून
शूरवीर किती झालेतच

सर्वधर्मसमभाव त्यांचा
सगळ्या धर्माचे सैनिक असती
प्रेमाने एकमेकांशी राहुनी
जातिभेद सारे विसरती

प्राथमिक कर्तव्य तयांचे
झटुनी राहती देती लक्ष
कर्तव्याशी एकरूप राहूनी
सोडविती अनेक प्रश्न यक्ष

प्राण जीवात राहीस्तोवर
कर्तव्याला जागे राहती
देशासाठी लढताना मग
स्वतःचा जीव धोक्यात घालती

सैनिक त्यांना होण्यासाठी
दुःख कष्ट सोसावे लागते
तळमळ त्यांची पाहुनिया
परमेश्वराची प्रार्थना करते

कठोर परिश्रम घेऊन
गुण आपले परिवर्तन करिती
जन्मगाव हा आपलाच
म्हणून त्यास स्वर्ग मानीती

रक्षण करता अभिमानाने
तिरंगा आपण उभा पाहूया
प्रणाम त्यांना आपला करुनी
भूषण त्यांचे सर्वा दावूया

सैनिक आहे मूर्ती शौर्याची
धैर्य आणि त्याग रक्तात आहे
देश सेवेसाठी कष्ट सारे
पहा कसे ते झेलत राहे

कडाक्याच्या थंडीमध्येही
गोठलेली पहा सारी वृष्टी
भूक तहान सारे विसरून
दिसे त्यांना आपलीच सृष्टी

झोप सुखाची घेतो आपण
सैनिक सीमेवर असतांना
वंदन करावे त्यांना नमुनी
सुरळीत राहो लढतांना

सौ माया मुत्यलवार

Marathi Poem on Fighter in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *