Marathi Poem on Love कविता by Swapnil

Marathi Poem on Love 1: Maza Blog

13th July 2020

Marathi Poem on Love

रात्र मंतरली शांत, पण स्वप्न कुठून आणायचे I आजारले काळीज सगळे, पण औषध कोणते आणायचे II

भरून आले डोळे, पण अश्रू कुठून आणायचे I संपले जगणे तरी, मरण कुठून आणायचे II

खूप काही शोधायचे, पण डोळे कुठून आणायचे I भरपूर चालत राहायचे, पण रस्ते कुठून आणायचे II

विचार वेगाने आले, त्यांना बंधन कसे आणायचे I मनी वसले एक जग, सत्यात कसे आणायचे II

खोटी आश्वासनं ऐकून, सत्य कसे लपवायचे I खूप काही सांगायचे, पण शब्द कुठून आणायचे. II कवी- स्वप्नील खैरनार.. Maza Blog

Marathi Poem on Love 2

13th July 2020

Maza Blog

तू सांग ना कसा मी जगू
तुझ्या असण्याची सवय कशी मी सोडू
तू माझ्या जीवाची पर्वा कसा मी राहू
तू आहेस स्वप्नसुंदरी
तू पिंजरा आणि मी तुझा राघु…Maza Blog

स्वप्नांच्या दुनियेत तू माझीच असतेस
माझ्या दुनियेतील कायदा तू ठरवतेस
स्वच्छंदी पाखरू तू फक्त माझ्याशी बोलतेस
डोळे उघडल्यावर आठवणी
आणि ते मिटताच तू दिसतेस…

चाहूल तुझ्या प्रेमाची मला हळूच लागली
तुझ्या प्रेमळ पावलांची वाट मला दिसू लागली
तुझ्या चेहऱ्यावरची चांदणी लख्ख चमकू लागली
माझ्या संपूर्ण आयुष्याला तेजोमय करू लागली… कवी- स्वप्नील खैरनार.. Maza Blog

Marathi Poem on Love 3

Marathi Poem on Love: Maza log

दिसणार नाही तुला तरी जवळ असेल,
सहवास माझा नेहमीच तुला भासेल,
माझ्या जगात तुला वेगळेच स्थान असेल,
दिसेल फक्त मला जगाला दृष्टी नसेल…

पिंजऱ्यात माझ्या कायमची तुला कैद असेल,
तुला कोणत्याही प्रकारचा जामीन मात्र नसेल,
प्रेमात पडशील तू असा तो पिंजरा असेल,
कायम तिथे राहायला तुझा मोठा गुन्हा असेल…Maza Blog

तुझ्या त्या मूर्ती वर संपूर्ण हक्क माझा असेल,
कोणताच पुरावा नसलेला तो ताबा असेल,
त्या विश्वात मी सांगेल तो कायदा असेल,
माझ्या ओढीचा तो एक आगळा नियम असेल…

मनमुराद प्रेम करणारा मी तिथे एकटाच असेल,
दिसेल मी कोणाला असा डोळा तिथे नसेल,
तुझ्यावर प्रेम करायला मला तुझीच गरज नसेल,
त्या वेदनेच्या पलिकडचे समाधान माझ्यात असेल…

फक्त शांततेने भरलेली ती वेळ अबोल असेल,
असू देणारा आणि ते पुसणारा मीच असेल,
माझी अपेक्षा पूर्ण करायला प्रयत्न माझाच असेल,
एका बाजूने अथांग भरलेलं ते प्रेम माझं असेल…. कवी- स्वप्नील खैरनार.. Maza Blog

मराठी चारोळी

स्वप्नातील बंधन सत्यात उतरले,
मनातील भावना उलगडू लागले,
तुझ्या हृदयात श्वास गुंतू लागले,
मी नव्याने तुझ्या प्रेमात पडू लागले… कवी- स्वप्नील खैरनार.. Maza Blog

Marathi Poem on Love

कवी- स्वप्नील खैरनार

You may also like Cheap Made in India Smartphone

हिंदी कविता वाचा- https://hindipanditjee.blogspot.com/2020/08/mansoon.html?m=1

Marathi Recipe वाचण्या साठी इथे क्लिक करा

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 1 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

1 thought on “Marathi Poem on Love कविता by Swapnil”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
21 × 8 =