Marathi Poem On Maitri

Friendship By प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे | Best Marathi Poem On Maitri 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे यांची -Friendship – हि कविता -Marathi Poem On Maitri- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

Friendship By प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे | Best Marathi Poem On Maitri 2023

Friendship | Marathi Poem On Maitri

Friendship By प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे | Best Marathi Poem On Maitri 2023

फ्रेंडशिप म्हणजे जीवलग जीवाला
जीव देणारी खरी मैत्री असते
मैत्री असते निर्मळ, स्वच्छ, सुंदर
पाण्याची प्रवाहासारखी संथ वाहणारी

मैत्री असते वा-याच्या गतीने गारवा
देत मनाला थंड स्पर्श करणारी
मैत्री असते सुखदुःखात प्रेमाने साथ
देणारी मैत्री असते निस्वार्थी – स्वार्थ

त्यात कदापीही नसतो असते ते प्रेम
मैत्री असते अबोल न बोलताच
सर्व काही बोलून जाणारी आपलेपणाची
जाणीव करून देणारी मैत्री असते प्रेम

मैत्री असते प्रेमाची परिभाषा दुःखात
जवळ घेऊन जादूची छप्पी देणारी
नात्यांची जवळीक वाढविणारी मैत्री
असते विरहात भावना समजून घेणारी

मैत्री असते चांगल्या विचारांची जपवणूक
करून ठेवणारी मैत्री असते शेवटपर्यंत
नाते टिकवणारी जो ही मैत्री
जपतो त्याला ही खरी मैत्री कळते

थोडक्यात मैत्री म्हणजे खरे जीवन
जगण्याचा मार्ग असतो मैत्रीला फक्त
आणि फक्त प्रेमाचाच भाव असतो
मैत्री करा पण मैत्रीचा शेवट करू नका

मैत्रीत अचानक डोळे भरून येतात
आणि अश्रूंनी वाहून जातात मैत्री
हा असा कट्टा आहे जिथे मनातील
सर्व भावना बोलून मन मोकळे होते

मैत्रीत असतो दुरावा तो फक्त
काही काळांपुरता मर्यादित असतो
जेव्हा तो दूरावा दूर होतो
तेव्हा ती मैत्री पूर्वीपेक्षा घट्ट होते

मैत्री कधीच हरवून होत नसते
स्वभाव आणि मन जूळली की
आपोआप एकमेकांत जीव गुंतला जातो
आणि एकमेकांशिवाय न बोलता राहवत नाही

मैत्री असो की नाती जर ती खरपणाने
टिकवली तरच ती टिकत असतात
नाही तर उगाच त्या नात्याला तडा
गेल्यावर त्याला फेवीकाॅल लावून जोडून

काहीच फायदा होत नाही एकदा तडा
गेलेले कालांतराने परत तो तडा
दिसून येतो त्यासाठी हृदयापासून
ती मैत्री या नाती जपावी लागतात

मैत्री हा खळवळणारा प्रेमाचा सागर
प्रेमाने वाहणाऱ्या सागरात मनसोक्त डूबावे
मैत्रीत मनातील वेदना हदयाला कळतात
ही अनमोल देणगी आहे

– प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे

Friendship By प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे | Best Marathi Poem On Maitri 2023

Best Marathi Poem On Maitri 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Friendship By प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे | Best Marathi Poem On Maitri 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *