तोच खरा सैनिक | Best Marathi Poem on Sainik in 2024

श्री. विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Poem on Sainik in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Marathi Poem on Sainik in 2024

काव्यबंध आयोजित रविवारीय काव्य लतिका स्पर्धा
दि.25/2/2024.
विषय- सैनिकासाठी कविता

तोच खरा सैनिक | Marathi Poem on Sainik in 2024

कायम डोळ्यात तेल घालून,
रात्रंदिवस खडा पहारा देणारा..
शत्रू सोबत पर्वा न करता
सीमेवर सतत लढत राहणारा..1

कठीण परिस्थितीचे प्रशिक्षण घेणारा,
मिळेल त्यात समाधान मानणारा..
आई वडिलांपासून कित्येक,
मैल दूर देशी राहणारा..2

राष्ट्र या मातेच्या रक्षणार्थ,
जन्म देणाऱ्या आईपासून दूर जाणारा..
राष्ट्रध्वज या पित्याच्या रक्षणासाठी,
खऱ्या बापापासून दूर राहणारा..3

मिळेल त्या परिस्थितीस,
सांभाळून घेत नेटाने राहणारा..
वेळप्रसंगी मिळेल ते खाऊन
पिऊन आपले कर्तव्य बजावणारा..4

आधी लगीन कोंढाण्याचे मग,
रायबाचे या उक्तीने वागणारा..
घर अन समाजातील चांगल्या वाईट,
कार्यक्रमास कर्तव्यामुळे मुकणारा..5

घरदार परिवार यावर केवळ,
देशसेवेसाठी हसत तुळशीपत्र ठेवणारा…
मुले लहानाची मोठी कधी,
झाली हे ही न समजणारा…6

देशाच्या रक्षणासाठी निधड्या,
छातीवर बिनधास्त गोळया झेलणारा…
वेळ पडल्यास राष्ट्र रक्षणास
प्राणाचे आनंदाने बलिदान देणारा…7

हिमालयात हाडेही गोठवणाऱ्या,
थंडीतही कडक पहारा देणारा…
वाळवंटातील रखरखत्या उन्हात,
घामाने भिजत काम करणारा..8

सागरातील सीमेच्या रक्षणासाठी,
कित्येक महिने पाण्यात राहणारा..
आकाशातील हल्ल्यापासून रक्षण करण्या,
वायुसैनिक बनून तैनात राहणारा..9

देश हा देव असे माझा,
हे नेहमी हृदयातून मानणारा..
त्याची आण बाण शान जपण्यास,
कुर्बान होण्यास तयार असणारा..10

सामान्य माणसाचा आपल्या
कर्तृत्वाने विश्वास जिंकणारा..
आबाल वृद्ध यांच्या मनात
आदराचे स्थान निर्माण करणारा..11

जय जवान जय किसान या,
उक्तीस गर्वाने सार्थ ठरवणारा..
वर्दीतील सेवा संपली तरीही
सदैव सैनिक म्हणून जगणारा…12

✍🏼 श्री. विजय तानाजी पाटील (तासगाव ) ✍🏼

Marathi Poem on Sainik in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *