marathi quotes on aaji

संस्कार कविता | Best marathi quotes on aaji 2023

विद्या प्रधान यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi quotes on aaji विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi quotes on aaji

काव्यबंध समुह आयोजित स्पर्धा
काव्यलतिका
१४/९/२०२३
काव्यलेखन स्पर्धा
स्पर्धेसाठी स्वरचित कविता
विषय:-आजीची छकुली

शीर्षक:- संस्कार marathi quotes on aaji

संस्कार कविता | Best marathi quotes on aaji 2023

जन्मास इवले बाळ तान्हे
मुलगी झाल्याने सुखावले
कुटुंबात आनंदी आनंद
आजीने मांडीवर घेतले. १

लाड कौतुकातून वाढले
संस्कार आजीने शिकवले
बोट धरून चालू लागली
जिद्दीने पाऊल उचलले. २

आजी आजोबांशी
खेळे खुप
पकडापकडीचे अप्रुप
राज्य घ्यायची स्वतःवरती
चिमुरडीचे साजिरे रूप. ३

होती प्रेमळ गोजिरवाणी
नाजूकशी आजीची छकुली
आनंदाने आजी घाले वेणी
म्हणे! नात आहेच गोडुली. ४

माहिती सांगे वनस्पतींची
पाहण्यासाठी नेई रानात
कुरमुरे भेळ बरोबर
पिशवी छकुलीच्या हातात. ५

खेळ खेळायची घोडा घोडा
आजीच्या पाठीवर बसून
छोट्या मुठीत
साडी पदर
चाल माझ्या घोड्या सांभाळून. ६

परीराणी आजीची सुंदर
गोष्टी शिवाजीच्या ऐकायची
इतिहास अतिशय प्रिय
ऐकून कुशीत झोपायची. ७

आजोळच्या मैत्रिणींसोबत
नदीवर जाई पोहायला
साद घालीत मोठमोठ्याने
आजीला सांगे! खाऊ द्यायला . ८

आजी आजोबांची
लाडी नात
चुरूचुरू बोलायची छान
आईबाबांना वाटे कौतुक
परिवारातील असे शान. ९

आजीबरोबर भजनास
गाणे गायची सुर तालात
हार्मोनियम पेटी शिकली
कलागुण आजीचे अंगात. १०

विद्या प्रधान
ठाणे

marathi quotes on aaji

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *