Marathi Recipe Puran Poli

Marathi Recipe Puran Poli:पुरणपोळी

पुरणपोळी ही एक महाराष्ट्रीयन पारंपारिक अशी मराठी रेसिपी आहे. प्रत्येक सणाच्या वेळेस खास करून पुरणपोळी बनवली जाते. पोळी ही हरभरा डाळ व गूळ घालून केली जाते.
याची बनवण्याची पद्धत सोपी जरी असली तरी थोडा वेळ त्यावर मेहनत घेतली तर अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी पूरण पोळी बनवता येते. मग आज आपण पूरण पोळी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत जाणून घेऊ या.अशी ‘पुरण पोळी ‘ही मराठी माणसाची सामान्यत: घरी तयार केलेली मिठाई आहे.Marathi Recipe Puran Poli.

पुरणपोळी रेसिपी साहित्य: Ingredients For Puran Poli

पीठासाठी साहित्य:
२ कप गव्हाचे पीठ,१ ते १/४ कप पाणी,१ कप मैदा,चवीनुसार मीठ,३ चमचे तेल.

पुरणासाठी साहित्य :
१ कप हरभरा डाळ,१ ते दीड कप बारीक चिरलेला गूळ, जायफळ पावडर,वेलची पावडर.

पुरण बनवण्याची पद्धत :
१)हरभरा डाळ घेऊन ती चांगली धुवा. त्यामध्ये २ ते ३ कप पाणी घालून ती कुकर मध्ये शिजवायला ठेवा .
२) मध्यम गॅसवर ६ ते ७ शिट्या करून शिजवा.
३)कुकर थंड झाला कि गाळनीच्या सहाय्याने जास्त झालेलं पाणी बाजूला काढून ठेवा .
४)शिजलेली डाळ गॅस वर ठेऊन त्यात कापलेला गूळ टाकून ते मिश्रण एकजीव ,घट्ट होईपर्यंत परतवून घ्या.
५)गुळाचे खडे राहणार नाहीत याची काळजी घ्या .
६)त्यामध्ये जायफळ पावडर आणि वेलची पावडर चांगली मिक्स करावी.
७)मिश्रण थोडं गरम आहे तोपर्यंतच पुरणयंत्रा मधून पुरण बारीक करून घ्यावे .Marathi Recipe Puran Poli

Marathi Recipe Puran Poli

पीठ मळण्याची पद्धत:

एका परातीत गव्हाचे पीठ आणि मैदा घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला.तुमच्या चवीनुसार गव्हाचे पीठ आणि मैदाचे प्रमाण बदलू शकता. दोन्ही एकत्र चांगले मिसळा.सुरुवातीला पीठ घट्टसर मळून घ्या .१ ते २ तास तसेच भिजत राहू द्या . त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून ते मऊ होईपर्यंत मळून घ्यावे .त्यानंतर त्याला थोडे तेल लावून ठेवावे .कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून त्यात पुरण भरा . पुरण भरल्यावर त्याचे तोंड चांगले घट्ट दाबून पोळी लाटायला सुरुवात करा.पोळी लाटताना ती दोन्ही बाजूने आणि कडेने लाटली गेली पाहिजे . मध्यम आचेवर तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर तव्यावर लाटलेली पोळी ठेवा.ती चांगली दोन्हीही बाजूने भाजून घ्या. साजूक तूप लावून गरम गरम पोळी खायला घ्या.Marathi Recipe Puran Poli

टीप

पुरण पोळी साठीं हरभरा डाळ शिजवून घेतल्यावर जे पाणी शिल्लक राहते, ते कटाची आमटी बनवताना वापरावे. पुरण पोळी बनवताना पूरण आणि पीठ हे दोन्ही मऊ झाले तर पोळी छान लाटली जाते . जर पुरण घट्ट झाले तर त्यामध्ये गुळाचे पाणी थोडे थोडे टाकून ते पुरण मऊ करून घ्यावे.शक्यतो मैदा घातल्यानंतर पोळी फुटत नाही.Marathi Recipe Puran Poli

पुरण पोळी अतिशय लोकप्रिय अशी स्वीट डिश आहे. पूरण पोळीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी वेळात ती बनवली जाते.घरी कोणी पाहुणे आले तर बाजारातून काहीही आणण्याची गरज नाही, घरी पूरण पोळी बनवावी आणि खायला द्यावी .बरेच लोक असे मानतात की पुरण पोळी ची मूळ सुरवात महाराष्ट्र राज्यामध्ये झाली. कदाचित “महाराष्ट्रीयन पुरण पोळी” अस्तित्त्वात आहे.महाराष्ट्र तसेच गोवा आणि गुजरात ही ठिकाणे पुरण पोळी तयार करण्यासाठी प्रसिध्द आहेत.Marathi Recipe Puran Poliवजन कमी करण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. पुरण पोळी मध्ये साजूक तूप आपण लावतो आणि दुधाचा वापर करतो.हे दोन्ही पदार्थ एकत्र येऊन चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देतात. तूप हा एक चांगला चरबीस्रोत आहे. दूध आपल्याला दिवसभरासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम आणि खनिज सामग्री देते.

Mrs .Swati Kshirsagar

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- गुढीपाडवा सणा विषयी माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *