बिर्याणी ही बर्याच देशांमध्ये लोकप्रिय असलेली एक उत्सवाची डिश आहे. पारंपारिक बिर्याणीमध्ये सुवासिक तांदूळ वापरतात. तळलेला कांदा,मसाले,औषधी वनस्पती आणि केशर मिसळलेले दूध यांचा थर असतो. एक चांगली बिर्याणी बनवण्यासाठी वेळ आवश्यक असतो.विशेषत: पारंपारिक पद्धतीसाठी वेळ लागतो .आणि संयम आवश्यक असतो. मॅरीनेशन, बिर्याणी ग्रेव्ही शिजवणे, भात शिजवणे, थर लावणे .आणि शेवटी डम कुकिंग याचा समावेश होतो.Marathi Recipe Veg Biryani
आवश्यक साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ, पातळ उभे चिरून २ मध्यम कांदे ,मटार १/२ कप घ्यावेत. फ्लॉवरचे ६-७ तुकडे , १/२ कप गाजराचे काप घ्यावेत. १/४ कप फरसबीचे तुकडे आवडणाऱ्या भाज्यासुद्धा घ्याव्यात. १ कप टोमॅटो प्युरी, १०-१५ काजू घ्यावे . प्रत्येकी १ टे. स्पून आले – लसूण पेस्ट, पाव कप मलई दही घ्यावे. ३ ते ४ टे.स्पून गावरान तूप किंवा बटर, १/२ टी स्पून लाल तिखट ,चवीनुसार मीठ. Marathi Recipe Veg Biryani
गरम मसाला
दालचिनी १ इंच , लवंगा ४-५ ,वेलची २-३ , तमालपत्र ३-४ घ्यावे. काळी मिरी ४-५ ,१ मसाला वेलची घ्यावी. चवीपुरते मीठ, केशर २ चिमटी घ्यावी. आणि २ टे. स्पून गरम दूध.Marathi Recipe Veg Biryani
बिर्याणीसाठी ग्रेव्ही
कढईत १ टे. स्पून तूप(साजूक) गरम करावे. त्यात अगोदर काजू तळून घ्यावे . त्यानंतर गरम मसाले टाकून काही वेळ चांगले परतावेत.
कांदा, आले-लसूण पेस्ट घालावी. कांदा थोडा परतून घ्यावा .गाजराचे तुकडे,फरस बी, फ्लॉवरचे तुरे, मटार या भाज्या घ्याव्यातं. तिखट आणि मीठ घालून ३-४ मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. नंतर टोमॅटो प्युरी घालावी. मध्यम आचेवर टोमॅटो प्युरीचा कच्चा वास जाईपर्यंत शिजवावे. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झाले पाहिजे. नंतर त्यामध्ये दही घालणार आहोत. ग्रेव्ही पातळ राहिली तर बिर्याणी बनवताना भात ओलसर राहतो, बिर्याणी सुटसुटीत होत नाही.घोटलेले दही गार झालेल्या ग्रेव्हीत मिक्स करावे.Marathi Recipe Veg Biryani

भात
बासमती तांदूळ स्वच्छ पाण्यात १५-२० मिनिटे धुवून निथळत ठेवावा. नॉनस्टिक कढई मध्ये १ टे. स्पून तूप(साजूक) गरम करावे . त्यामध्ये १-२ वेलची ,१-२ लवंगा आणि १ तमालपत्र घालून त्याचा सुगंध येईपर्यंत परतावे. धुवून निथळलेले तांदूळ त्यामध्ये घालावेत. कमी आचेवर तांदूळ कोरडे होई पर्यंत सतत परतत राहावे .दुसऱ्या साईडला गॅसवर दीड कप पाणी गरम करावे. तांदूळ छान परतले की त्यामध्ये गरम पाणी आणि मीठ घालून गॅस मोठा ठेवावा.भाताच्या पृष्ठभागावर पाणी दिसायचे बंद होईपर्यंत गॅस मोठा ठेवावा . आच एकदम कमी करून वाफ जाणार नाही असे झाकण ठेवावे.मंद आचेवर भात शिजवुन शिजलेला भात हलकेच ताटात काढून गार करून घ्यावा .Marathi Recipe Veg Biryani
बिर्याणी
शक्यतो बिर्याणी बनवण्यासाठी खोलगट असे नॉनस्टिक पातेले घ्यावे. तळाला तूप पसरवून त्यामध्ये एकूण भातापैकी १/४ भाग भात पातेल्यात समान पसरवा. त्यावर तळलेल्या कांद्यापैकी थोडा कांदा,काजू आणि थोडी ग्रेव्ही पसरावी. असे ३ ते ४ थर बनवावेत. प्रत्येक थरामध्ये चमचाभर तूप पण घालावे.या मध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा खायचा रंग पण वापरू शकता . सर्वात वरचा थर हा भाताचा असावा. त्यावर दुधात घातलेले काजू, केशर आणि तळलेला कांदा घालून भांड्यावर वाफ न जाणारे घट्ट झाकण ठेवावे. किमान २० मिनिटे तरी मंद आचेवर बिर्याणीला वाफ काढावी.
गॅस बंद करून झाकण काढून हलकेच बिर्याणी मिक्स करावी. परत झाकण ठेऊन मुरू द्यावी. गरम बिर्याणी कांदा-काकडी-टोमॅटोच्या रायत्याबरोबर सर्व्ह करावी.Marathi Recipe Veg Biryani
टीप्स – बिर्याणी अधिक चवदार होते. त्यासाठी टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये १/४ कप मिल्क पावडर किंवा हेवी क्रीम घालू शकतो.क्रीम घातली तर ग्रेव्हीला उकळी काढावी. क्रीम फुटू नये म्हणून उकळताना सारखे ढवळावे.हवी तेव्हा झटपट बिर्याणी बनवता येते. त्यासाठी ग्रेव्ही तयार करून ३ ते ४ दिवस फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो.
Author:-Mrs. Swati Kshirsagar
शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता
पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १
Click to read- The Power Of Relationships