काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी हभप सौ शुभांगी सोमनाथ जाधव काशीकर यांची -निसर्ग कोपला- हि कविता -किमयागार निसर्ग- विषयावर असून हि Marathi Shetkari Kavita आहे
निसर्ग कोपला | Marathi Shetkari Kavita

जीव आला मेटाकुटीला
असा घात पावसानं केला…
जनावर उपाशी दावणीला,
काय करावं धूळ पेरणीला…..
लय मोठं सपान रंगवलं
मी यंदाच्या या वरसाला..
गेला कोरडा हो आखाड
नाही टिपूस पडला धरणीला….
लेकरांची साळा बीना दप्तराची
दिली शिवून पिशवी गोनीची,,
आला कसा हा निराळा काळ
पिढी अडाणी आधुनिकतेची….
कसं सांगू मनातल गाऱ्हाणं
काळया आईला मी नवसारताना..
गेली झीजून माझी काया
काळजीच्या घामात भिजताना…
केलं बी-भरान उसनवारीत
कर्जाचा डोंगर फेडण्याचा आशेनं,
कसा कोपला निसर्ग माझ्यावर
उमजना मला जगू कोणत्या दिशेने….

निसर्ग कोपला | किमयागार निसर्ग | Best Marathi Nisarg Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
Good
Good
Nc poem Shubhangi