दोन जुन्या मित्रांची भेट आणि अनेक गप्पा. या गप्पांमधूनच पुढे काय शिकवणी मिळतात हे या रंग माझा वेगळा | Marathi Short Story on Education लघुकथेमध्ये पाहणार आहोत.
रंग माझा वेगळा | Marathi Short Story on Education

तिने कचकन ब्रेक दाबला. डोळ्यावरचा गाॅगल वर केला आणि तोंडाचा पट्टा चालू करणार, तितक्यात समीरचा गोंधळलेला चेहरा तिला दिसला. “सम्या तू?” ती जवळ जवळ ओरडली. समीरने चमकून नीट बघितलं. गोरीपान, मोकळे सोडलेले लांब कुरळे केस फिकट ब्राउन कलरने हायलाइट केलेले, मोरपीसी कुर्ती, त्याला साजेशी क्रिम कलरची लेगीन्स, कानात सिल्व्हर झुमके, हातात टायटनचे घड्याळ, डोक्यावर Ribbon चा गाॅगल, आणि पायात मोजडी अशी राधिका समोर. “अरे सम्या, तू मला नाही ओळखलंस… मी राधिका, राधिका एकबोटे. मिलिंद सरांच्या अकाउंट क्लासला एकत्र होतो ना आपण. ” ती म्हणाली.
रंग माझा वेगळा | Marathi Short Story on Education
तसा तो तीन ताड उडालाच. त्याला काॅलेजमधली ती आठवली… डोळ्याला भिंगाचा चष्मा, चापूनचोपून घातलेली वेणी, लांब बाह्यांचा पंजाबी ड्रेस, आणि हातात सतत एखादं पुस्तक. “काय रे, एवढा कसला विचार करतोयस? ” राधिकाच्या प्रश्नाने समीर भानावर आला. “अगं केवढाsss बदल झाला आहे तुझ्यात! मी आधी ओळखलंच नाही. ” राधिका मनापासून हसली. ” हो ना, कित्ती वर्षांनीं भेटतो आहोत आपण. चल, समोरच्या काॅफी शाॅपमध्ये जाऊया ” असं म्हणत तिने स्कूटी पार्क केली सुध्दा. मग समीरनेही बाजूलाच त्याची मोटारसायकल पार्क केली आणि ते काॅफीशाॅपच्या दिशेने निघाले.
” One Capachinoo with hot chocolate, तू काय घेणार? ” राधिकाने त्याच्याकडे बघत विचारले. ” I prefer cold coffee ” तो म्हणाला. ” राधिका, तुझ्यात हा बदल कसा काय झाला? ” न राहून त्याने पुन्हा एकदा विचारले. “सांग ते रे बाबा, आधी मला सांग, तुम्ही सर्व मला काॅलेजमध्ये जस्सी म्हणून चिडवायचा ना? ” समीरने हसून मान डोलावली. तेवढ्यात त्यांची काॅफी आली. “चिअर्स” राधिकाने काॅफीचा मग उचलून म्हटले. त्यानेही त्याचा मग उचलत तिला प्रतिसाद दिला.
रंग माझा वेगळा | Marathi Short Story on Education
काॅफीचा घोट घेत ती बोलू लागली, “मला final year नंतर C.A. करायचं होतं. पण आत्याने राहूलचं स्थळ आणलं. राहूल पटवर्धन, साॅफ्टवेअर इंजीनियर, फारच उमदं व्यक्तीमत्व, आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, मनमिळाऊ स्वभाव….. नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं. मग काय, झालं आमचं लग्न. ” इतक्या लवकर? ” समीरने न राहून मध्येच विचारले.
“हो, आणि वर्षभरात शुभमचा जन्म सुद्धा झाला. ” ती म्हणाली. त्यानंतरची दोन तीन वर्षे शुभमच्या सहवासात भुर्रकन गेली. शुभम शाळेत जाऊ लागला आणि माझी CA करण्याची इच्छा पुन्हा उफाळून आली. राहुलला सांगितल्यावर त्याने प्रोत्साहन दिले. मग लगेचच admission घेतले. लहानग्या शुभमला शाळेत सोडून मी काॅलेजला जायचे. तारेवरची कसरत होती नुसती. पण राहुलचा भक्कम पाठिंबा होता. माझ्या बरोबरीने तो घरातील सगळी कामं करायचा. रात्रीचा अभ्यास करायचा आणि दिवसा घरातील कामं…. ती थांबली.
रंग माझा वेगळा | Marathi Short Story on Education
समोरच्या ग्लासातील पाणी प्यायलं. तिला थोडं बरं वाटलं. मग काय, झाले CA तेही मेरीट मध्ये. मला खूप आनंद झाला…. ती सांगू लागली. मग एक एक पाय-या चढत गेले. आज छान एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. गलेलठ्ठ पगार, फाॅरेन टूर्स हे सगळं छान एन्जॉय करते आहे. काय मग, पटलं की नाही ” जस्सी जैसी कोई नहीं ! ” दोघेही खळखळून हसले. “बरं चल सम्या, आपल्याला आता निघायला हवं. शुभमची उद्या test आहे. ” दोघांनी एकमेकांचे फोन नंबर share केलेआणि त्याला बाय करून ती निघाली. तिच्या पाठमो-या आकृतीकडे तो बराच वेळ बघत राहिला.

खरंच, शिक्षण किती बळ देत माणसाला! तिच्या चेहऱ्यावरचा confidence, देहबोली त्याला खूप काही सांगून गेली. त्याने आपल्या मोटारसायकलला किक मारली. घराकडे न जाता तो तडक जवळच्या इंजिनिअरिंग काॅलेजला गेला. नेहाला लग्नाआधी MCA करायचं होतं. पण त्याचं लग्न ठरलं आणि राहूनच गेलं. त्याने admission form घेतला, बाजूच्या दुकानातून तिच्या आवडीची dairy milk घेतली. शीळ मारत त्याने मोटारसायकल सुरू केली. दूर कुठे तरी गाणं वाजत होते….
ऊन भरल्या अंगणी
चांदण्यांच्या सावल्या
सख्या माझ्यातून हा
रंग माझा वेगळा!
रंग माझा वेगळा | Marathi Short Story on Education
-: Author :-
पल्लवी हर्षद
ठाणे
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
रंग माझा वेगळा | Marathi Short Story on Education