maza baap shetkari kavita

शेतकरी राजा आणि वाटलं होतं कर्ज माफ करेल | 2 Best maza baap shetkari kavita

अनिता बर्गे भोसले आणि वैष्णवी सं ठाकरे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत maza baap shetkari kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

शेतकरी राजा | maza baap shetkari kavita

काव्यबंध समूह
आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार
गुरुवारची स्पर्धा
दिनाक 31/08/2023
विषय – शेतकरी

||शेतकरी राजा ||

शेतकरी राजा आणि वाटलं होतं कर्ज माफ करेल | 2 Best maza baap shetkari kavita

पड लवकर रे बापुड्या, नको घेऊ आढेवेढे.
पडलास वेळेत तर, काय तो आनंद गडे,
सर्ज्या राजा पाभारीला , कारभारीन मोघ्याकडे.
बी उसने आणून ,पेरले , ज्वारी ,बाजरी चोहीकडे,
पण अवकाळी आलास, नासविले सगळीकडे.

खरीपा ने दगा दिला, सांगू कुणाला मी बापडे,
संसाराच्या अंगावर , अजूनही फाटकी कापडे.
ऋण घेऊन सण करतो, सुटत नाही त्रांगडे,
कोडे अवघड जीवनाचे, नाही सुटत आता बडे.


रब्बी साठी धावपळ करण्या, नाही हातात त्राण गडे,
बायका पोरांकडे पाहून, आहे शांत आता खडे.
सुटला नाही धीर अजूनही, ताठ कणा,पाय पुढे,
नुसताच राजा,कष्टी राणी, सदैव चाले पुढे पुढे.

पीक विमा, प्रधानमंत्री सन्मान, या योजना किती तोकड्या,
कर्ज मुक्ती ,ही भीक, नका घालू ह्या बेड्या.
शेतकरी नवरा मला नको , म्हणती आमचीच बायडा,
जगुद्या स्वाभिमानाने आम्हाला, ऐकुन पडतो काळजाला तडा.


पिचत चाललोय आत्ता आम्ही, घ्यावा सरकारने यातून धडा,
उठवा निर्बंध भावावरचे, दया भाव मालाला तगडा.
जर,झालास्वार्थी,तुमच्यासारखा, हा जगाचा पोशिंदा,
होईल धरणीकंप भूवर, लढा त्यासव एकदा.

अनिता बर्गे भोसले
सातारा

वाटलं होतं कर्ज माफ करेल | maza baap shetkari kavita

“काव्यबंध समूह”
आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार

वाटलं होत..कर्ज माफ करेल.

वाटलं होतं कर्ज माफ करेल | 2 Best maza baap shetkari kavita

साऱ्या जगाचा पोशिंदा.
माझा शेतकरी बाप‌ं.
गळफास घेऊन मेला,
तरी ना होतंय कर्ज माफ.

जेव्हा बी टाकतो जमिनीत.
एकच आस असे त्याला.
काळ्या मायेला सांगे,
यंदा बघ तुझ्या लेकराला .

मोठा आभाळ हो बाप,
पण वेळेवर नाय साथ.
दरोदरी पसरे तो,
कर्जा साठी हात.

देणं बाकी हाय मागचं.
बायकोचं मंगळसूत्र ठेवलं गहाण.
त्या अवकाळी पावसान,
माती मोल केलं शेतातील वान.

शेतात विचार करू करू,
रातन झोप नाय डोळ्याले.
साऱ्या जगाचा पोशिंदा.
पण त्यालेच नाय पोटभर खाले.

त्याचं सोन्याचं जीवन,
आता वाटे त्याला भार.
पोरग शिकावं म्हणून.
तो कष्ट करतो फार.

पोरीच्या लग्नासाठी,
खातो कमी तो भाकर.
घरच्यांच्या सुखासाठी,
उपाश्या पोटी देतो ढेकर.

शावकार तगाजा मागे लावे.
बँक ही नोटीस पाठवे.
अश्या साऱ्याच्या वागण्याने त्याला,
पर्याय आत्महत्या च आठवे.

फक्त एकच वाटे त्याला,
आता मी गळफास घेऊन मरेल.
माझ्या बिणबाप्या लेकराकळे पाहून,
वाटलं होत कर्ज माफ करेल.

✍️वैष्णवी सं ठाकरे

कर्ज  | 2 Best maza baap shetkari kavita

maza baap shetkari kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *