बळ | Best maze baba kavita in marathi in 2023

बळ | Best maze baba kavita in marathi in 2023

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत maze baba kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

maze baba kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका .
प्रत्येक रविवारची स्पर्धा.
दि.१५/१०/२०२३
विषय..वडील/बाबा /पप्पा /बाप.

बळ | maze baba kavita in marathi

वडील,बाबा पप्पा,बाप
नावं जरी असती अनेक
आधारस्तंभ घराचा असतो
प्रत्येकाचा बापचं नेक

शिक्षकाचा पेशा असे
माझ्या वडिलांचा
वरून कडक आत मऊ
गाभा जसा फणसाचा

शिक्षणाचं करून कार्य
संगीतात ही रममाण व्हायचे
तबला,पेटी वाद्य वाजवताना
भजन कीर्तन ही गायचे

गीत कविता रचून स्वतः
संगीतबद्ध करायचे
भाषण करता ऐकणाऱ्याला
मंत्र मुग्ध करून सोडायचे

सर्व भावंडा वर होत
प्रेम त्यांचं नेहमी अपार
सत्याची देऊन शिकवण
असत्यावर करत वार

घरीदारी असे नेहमी
वातावरण शिक्षणाचं
पाठांतर, वाचन,हस्ताक्षर
लक्ष आमच्याकडे असायचं

इतिहासाच्या सांगून गोष्टी
अर्थ बोध देत समजून
त्यांच्या मुळेच घडलो
संस्काराची शिदोरी घेऊन

वेळ प्रसंगी झाले कठीण
वज्रासम वाटले जरी
कष्टऊन देहाला स्वतःच्या
उधळ्ल्या आमच्यावर प्रेमसरी

सहवास न लाभला खूप
देवाचा खेळ असे सारा
तुम्ही दिले बळ लेखणीत माझ्या
म्हणून तुमच थोड लिहिण्याचा
बाबा प्रयत्न असे हा न्यारा.

सौ.संघमित्रा सोरटे.
माळशिरस.सोलापूर.

maze baba kavita in marathi

maze baba kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह