Mazi Maitrin Kavita In Marathi

आठवणीतला मित्र By कुमार.कु. तेजस गोविंद शिंदे| Best Mazi Maitrin Kavita In Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमार.कु. तेजस गोविंद शिंदे यांची -आठवणीतला मित्र- हि कविता -Mazi Maitrin Kavita In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

आठवणीतला मित्र By कुमार.कु. तेजस गोविंद शिंदे| Best Mazi Maitrin Kavita In Marathi 2023

आठवणीतला मित्र | Mazi Maitrin Kavita In Marathi

Best Mazi Maitrin Kavita In Marathi 2023

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी,
जसे होतो आम्ही शाळेत दोघे,
त्या आठवणी स्पर्श करतात नेहमी मनी,
डोळ्यातून येते पाणी नजर टाकली की मागे.

रोज एकत्र बसणे एकत्र जेवण आठवतंय रे,
खरं खरं सांग येते का रे आठवण माझी ,
नेहमी फक्त तोच प्रसंग आठवतोय रे,
कधी दूर सुट्टी देऊ नको आपल्या मैत्रीची.

दोघे खेळतानाही फक्त एकाच संघात खेळायचो,
कधी हरायचो तर कधी जिंकायचो पण मागे नाही हटायचो,
पूर्ण शाळेत दोघांना जिवलग म्हणून ओळखायचे,
किती झाली भांडण तरी आम्ही नेहमी एकत्रच राहायचं.

कधी खेळताना लागलं तुला तर त्रास मात्र मला व्हायचा,
दुसरा कोणी तुझ्या जवळ आला की मला खूप राग यायचा,
बोलण्यात तर तू कोणालाही नाही ऐकायचा,
प्रत्येक क्षणी आपल्या मैत्रीचा गुंता आणखी घट्ट व्हायला.

मधल्या सुट्टीत आम्ही इकडून तिकडून फिरायचो,
गप्पा आमचा नकळतच वाढायचा,
रोज आम्ही हसत जगायचो मारायचं गप्पा,
पण त्या गप्पा मात्र कधीच नसायचा अभ्यासाच्या.

कधी तू शाळेला नसल्यास की मला एकट वाटायचं,
तू नसलास की मी नेहमी एकटाच फिरायचं,
तू आलास की माझा चेहरा नेहमी खुलायचा,
तू असलास की मला मोठा आधार वाटायचा.

सर जेव्हा तुझ्यावर ओरडायचे राग मात्र मला यायचा,
जेव्हा आम्ही एकत्र वर्गात जायचं वर्ग पूर्ण आमच्याकडे पाहायचा,
मी एकटा दिसलो की सर्वजण तुला विचारायचे,
तू नसलास तरी नेहमी तू सोबत असल्याचा भास व्हायचा.

एका जागी बसून बोलत नकळत दिवस संपून जाई,
बोललेल्या त्या गोष्टी आता पुन्हा त्या क्षणी नेई,
तू सोबत असताना नेहमी वेळेचा विसर पडे,
तू माझा मित्र जो नेहमी माझ्यासोबत उभा राही.

जेव्हा दहावी होते आपली तेव्हा फक्त अभ्यास,
सरत होते जसे दिवस ,संपत होता आमचा शाळेचा प्रवास,
हो मित्रा मला अजूनही फक्त तुझीच आठवण येते,
जी माझी मैत्री मागे टाकू शकते कोनाएकाच्या प्रेमास.

एक मित्रा फक्त आपली शाळा संपलेय मैत्री नाही
तू नेहमी माझ्यासोबतच राहा बाकी काही नाही ,
रस्ते वेगळे झाले म्हणून नातं वेगळं झालं नाही,
मैत्रीपेक्षा मोठे या जगात काहीच नाही…….!

( माझा मित्र:- संकल्प गावडे.)

आठवणीतला मित्र By कुमार.कु. तेजस गोविंद शिंदे| Best Mazi Maitrin Kavita In Marathi 2023

आठवणीतला मित्र By कुमार.कु. तेजस गोविंद शिंदे| Best Mazi Maitrin Kavita In Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

आठवणीतला मित्र By कुमार.कु. तेजस गोविंद शिंदे| Best Mazi Maitrin Kavita In Marathi 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *