नागेश बोंतेवाड आणि अनिता मधुकर भोई यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत meaningful poem in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
meaningful poem in marathi
काव्यबंद समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
वार : रविवार दि.०१/१०/२०२३
विषय : आयुष्य
आनंदात जगून घ्यावे | meaningful poem in marathi

आयुष्य लहान आहे
आनंदात जगून घ्यावे
राहिलेले उद्यावरती
बिनधास्त सोडून द्यावे…..१
आयुष्यात येऊन सदा
एकच नियम पाळावे.
मान सन्मान देऊन
सदा आनंदी राहावे…..२
म्हणून म्हणतो मित्रा
मनासारखे घे जगून
नाहीतर अर्ध्यावरती
मित्रा जाशील निघून….३
झाले चूक भूल विसरून
सर्वांना सामावून घ्यावे
सामावून घेता घेता मात्र
विशाल सागर होऊन जावे..४
आयुष्याच्या उंबरठ्यावर
सुख दुःखाची साथ आहे
सुख दुःखात साथ देणारा
जिवलग मित्र वाट पाहे…..५
आयुष्यात संकटे येतील खूप
नको घाबरू संकटांना नित्य
संघर्ष करून मार्ग काढणे
आहे जीवनातील कटू सत्य…६
जीवनात येऊन दररोज
अपयशाला सामोरे जावे
सदा संघर्ष करता करता
यशला खेचून आणावे…..७
आयुष्य खूप सुंदर आहे
सुख दुःखाचे रंग भरून
सजवता आलेच पाहिजे
फुलवता येते कष्ट करून….८
म्हणून म्हणतो मानवा
सदा सर्वदा कष्ट करावे
कष्टानेच फुलते जीवन
सत्य वचन ध्यानी धरावे…९
स्वरचित कविता
✍️ नागेश बोंतेवाड,छत्रपती संभाजीनगर
meaningful poem in marathi
काव्यबंद समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
वार : रविवार दि.०१/१०/२०२३
आयुष्य | meaningful poem in marathi

आहे देवाची देणगी
खूप सुंदर आयुष्य
जगू सारे आनंदात
आहे हातात भविष्य
सुख दुःखाच्या वाटेत
सार्थ करून जगणे
येई काय ते पदरी
पुढे घेऊनच जाणे
आहे आयुष्य सुंदर
पान ते कोऱ्या वहीचे
कसे नेटके भरावे
सारे भास ते मनाचे
कुणी भेटे वाटेवर
भले आणिक ते बुरे
पण कोणाला आदर्श
ठेऊ हे पहावे खरे
दिले आयुष्य देवाने
काही तरी करू भले
ज्यांच्या काही अडचणी
करू त्यांचेच चांगले
मानू आभार देवाचे
दिले आयुष्य सुंदर
होई हातुन माझ्याच
नित्य सत्कर्मेच फार
जपू माहेर सासर
नाती अनेक जीवाची
याच आयुष्यात भेटे
सारी ते जीवाभावाची
भेटे ज्याला हे आयुष्य
ठेवा मनही प्रसन्न
कमी नाही पडणार
कर्म ते भिन्न विभिन्न
नाही मागून मिळत
कोणालाही हे आयुष्य
भाग्य ज्याचे आहे थोर
त्याचे उज्वल भविष्य
अनिता मधुकर भोई कुरूंदवाड (कोल्हापूर)

meaningful poem in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह