आपला सगळ्यांचा आवडता चटपटीत असा मेदू वडा हे दक्षिण भारतीय पाक कृतीतील कुरकुरीत, मऊ, आणि चवदार अशी डिश आहे. मेदू याचा अर्थ मऊ आणि वडा म्हणजेच फ्रिटर. नाश्ता , स्नॅक्स किंवा जेवणासाठीही दिले जाणारे अतिशय लोकप्रिय असा दक्षिण भारतीय पदार्थ आहे. हॉटेल तसेच टिफिन सेंटर या ठिकाणी देखील हे वडे मिळतात .
recipe for medu vada in marathi sambar | मेदू वडा रेसिपी
Medu Vada साहित्य :
उडदाची डाळ ३ वाट्या, चवीनुसार मीठ, ओल्या मिरच्या ३, अर्धा इंच आलं .
Medu Vada कृती :
उडदाची डाळ रात्री भिजत घालावी. सकाळी डाळीतील पाणी निथळून जाडसर वाटावी. त्यामध्ये चवीनुसार मीठ व आले बारीक करून घालावे.त्यानंतर चांगल्या प्रकारे एकत्र करून प्लास्टिकच्या कागदाला तेलाचा हात लावून लिंबाच्या आकाराएवढा वड्याचा गोळा बनवावा .
recipe for medu vada in marathi sambar for medu vada | मेदू वडा रेसिपी
जरासा जाडसर असाच थापावा व मध्यभागी होल पाडावे.कढईमध्ये तेल चांगले कडकडीत तापल्यावर एक एक वडा त्यामध्ये सोडावा म्हणजे वडा चांगल्या प्रकारे फुगून वर येईल.दोन्ही बाजूंनी लालसर झाल्यावर वडा निथळून बाहेर काढावा.

सांबर साहित्य :
२ वाट्या तुर डाळ, ४ वांगी, २ लालसर टोमॅटो, मोठे कांदे २ ,चवीला कोथिंबीर, लिंबाच्या आकारा एवढी चिंच, थोडा गुळ .
recipe for medu vada in marathi sambar for medu vada | मेदू वडा रेसिपी
सांबर मसाला :
धने २ छोटे चमचे , जिरे २ छोटे चमचे , चणाडाळ २ चमचे ,उडद डाळ २ चमचे , लवंग २ , दालचिनी २ – ३ तुकडे ,७-८ मिरिदाने,१०-१२ मेथीचे दाणे. १ छोटा चमचा तेल घेऊन वरील सर्व मसाले मंद गॅसवर गुलाबी रंगावर भाजावेत. हे मसाले थंड झाल्यावर मिक्सरमधे कोरडेच वाटावेत.
recipe for medu vada in marathi sambar for medu vada | मेदू वडा रेसिपी
मेदू वडा सांबर असे बनवावे :
उभा चिरलेला कांदा .वांगी व टोमॅटो हे पण मध्यम आकारात चिरावेत. डाळ व सर्व भाज्या कुकर मध्ये वेगवेगळ्या शिजवून घेणे .पातेल्यामध्ये अर्धा चमचा तेल ओतावे . तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी,१/४ चमचा जिरे,१/४ चमचा हिंग व १०-१२ कढीपत्त्याची पाने घेऊन फोडणी द्यावी.त्यामध्ये शिजलेली डाळ घालून ४-५ वाट्या पाणी घालावे आणि हवी तशी ग्रेव्ही पातळ करावी.
recipe for medu vada in marathi sambar for medu vada
त्यानंतर त्यामध्ये कांदा , शिजलेल्या भाज्या ,२ चमचे तिखट,चिमूटभर हळद, लिंबाएवढी चिंच,चवीनुसार गुळ,बारीक केलेला सांबर मसाला व कोथिंबीर घालावी.सांबरला चांगली उकळी येऊ द्यावी व नंतर गॅस बंद करावा. आता आपला खमंग मेदू वडा व सांबर खाण्यासाठी तयार झाले.
स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.
पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.