Misalpav Recipe In Marathi

Misalpav Recipe In Marathi:मिसळपाव

महाराष्ट्रातील मिसळ पाव हे खूप लोकप्रिय असं खाणं आहे,जे खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि मजेदार आहे.त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी मिसळ पाव कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत.मुंबईच्या पावभाजीप्रमाणे मिसळ पावही खूप लोकप्रिय आहे.ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. पण त्यातल्या त्यात कोल्हापुरी मिसळ ही खूपच खास आहे.काही ठिकाणी याला उसळ पाव असेही म्हणतात.कोल्हापुरी मिसळ ही मसालेदार आणि खायला खूप चविष्ट असते. त्यामुळे ही मिसळ पाव ची रेसिपी तुम्ही पण करून पाहू शकता,आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आणि तुमच्या मुलांना या रेसिपीने बनवलेली मिसळ नक्कीच आवडेल.Misalpav Recipe In Marathi

ज्या व्यक्तींना मसालेदार जेवण आवडते ते प्रत्येक जण महाराष्ट्रातील हा प्रसिद्ध नाश्ता मिसळ – पाव करून पाहू शकता. तसे पाहिले तर, ही मिसळ बनवणे काही अवघड काम नाही.
मिसळ बनवताना फक्त घरी वापरण्यात येणारे मसाले आणि साहित्य आवश्यक आहे.तुम्ही मिसळ पाव सकाळच्या नाष्ट्या पासून ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता.ही रेसिपी तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु ही डिश खूप चवदार आहे. अनेक पोषक अश्या तत्वांनी युक्त मिसळ पाव खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप वेळ भूक ही लागणार नाही.Misalpav Recipe In Marathi

मिसळपाव रेसिपी :प्रकार १

पेस्ट तयार करण्यासाठी:
२ चमचे तेल, २ चमचे आले पेस्ट,१ चमचा लसूण पेस्ट,१ चिरलेला कांदा,१ कप टोमॅटो चिरलेला,३/४ कप नारळ किसलेले,दीड कप मोड आलेली मटकी (पाण्यात भिजवलेली)अर्धा चमचा हळद पावडर,१ चमचा गरम मसाला,अर्धा चमचा दालचिनी-लवंग पावडर, लिंबाचा रस, 3 कप पाणी,चवीनुसार मीठ.Misalpav Recipe In Marathi

मिसळपाव सजवण्यासाठी साहित्य:

कांदा बारीक कापलेला ,फरसाण (कोरडा मिक्स केलेला ),कोथिंबीरीची पाने बारीक कापलेली,पाव ,लिंबाचे तुकडे.

मिसळपाव (ग्रेव्ही ) :
कढईत तेल गरम करून घ्यावे त्यात आले-लसूण आणि कांद्याची पेस्ट घालावी.ती पेस्ट हलक्या तपकिरी रंगाची होईपर्यंत परतून घ्या.त्यात टोमॅटो आणि किसलेले खोबरे घाला. काही वेळ चांगले तळून घ्या. मिश्रण भाजल्यानंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा.ते मिश्रण थंड झाल्यावर बारीक करा.कढईत तेल गरम करून घ्या. त्यात वाटलेली पेस्ट घाला आणि दोन मिनिटे चांगलं परतून घ्या.गरम मसाला, मीठ , लाल तिखट, हळद, जिरे-धणे पावडर, लवंग-दालचिनी पावडर घालून चांगले मिक्स करा.यानंतर त्यात पाणी घाला. हे मिश्रण तेल सोडेपर्यंत चांगले शिजवा.
मिश्रण शिजल्यावर ते एका भांड्यात टाकून बाजूला ठेवा.Misalpav Recipe In Marathi

Misalpav Recipe In Marathi

उसळ बनवण्याची पध्दत:

कढईत तेल गरम करून त्यात लसूण पेस्ट ,आले पेस्ट आणि हिंग घालून चांगले परतून घ्या.भिजवून मोड आलेल्या उसळमध्ये बटाटे मिसळा.त्यात हळद, गरम मसाला,मीठ, लवंग-दालचिनी पावडर आणि लिंबाचा रस घाला.पाणी घालून दहा ते पंधरा मिनिटे चांगले शिजवून घ्या .मिश्रण शिजल्यानंतर एका भांड्यात काढा आणि बाजूला ठेवा.एका भांड्यात प्रथम तयार केलेली उसळ टाका.यानंतर तयार केलेली ग्रेव्ही घाला आणि बारीक चिरलेला कांदा , फरसाण यांचे मिश्रण घाला.त्यावर कापलेली कोथिंबीर घाला . पाव आणि लिंबाच्या कापांसह सर्व्ह करा.Misalpav Recipe In Marathi

मिसळपाव रेसिपी :प्रकार २


मिसळपाव साहित्य:
२कप अंकुरलेली(मोड आलेली )मिक्स उसळ,१ चमचा चिंचेचा कोळ,बारीक चिरलेला १ बटाटा,बारीक चिरलेले १-२ कांदे,१ चमचा धने पावडर,१चमचा भाजलेली जिरे पावडर,१ चमचा गरम मसाला पावडर,३ चमचा लाल तिखट,२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,१ बारीक चिरलेला टोमॅटो,१ चमचा जिरे,१ चमचा मोहरी,२ कप पाणी,आले-लसूण पेस्ट,१०-१२ कढीपत्ता पाने ,तेल, १ चमचा साखर,हिंग एक चिमूटभर ,चवीनुसार मीठ,पाव.Misalpav Recipe In Marathi

मिसळपाव सजवण्यासाठी साहित्य:

१ बारीक चिरलेला कांदा,१ चमचा चिरलेली कोथिंबीर,१ कप शेव,लिंबाचे तुकडे.

उसळ बनवण्याची पध्दत:

मोड आलेली (अंकुरलेली )उसळ स्वच्छ धुवून गाळून घ्या.कुकरमध्ये चिरलेले बटाटे, टोमॅटो, लाल तिखट, मीठ,हळद, चिमूटभर हिंग आणि ३ कप पाणी घालून ३ शिट्ट्या करून शिजवा.
कढईत तेल गरम करून . त्यात जिरे आणि मोहरी टाका.जिरे तडतडल्यावर त्यात कढीपत्ता आणि हिंग घाला. थोड्या वेळाने कांदा घालून परतून घ्या .कांदा हलकसा तपकिरी झाला की त्यात मीठ आणि साखर घाला.नंतर आले-लसूण पेस्ट घालून चांगले परतावे. त्यानंतर सर्व मसाले घालून मिक्स करावे.मसाले मिक्स झाले कि त्यात चिंचेचा कोळ घालुन थोडा वेळ शिजू द्यावे .
आता त्यात उकडलेले अंकुरलेले उसळ घाला. ग्रेव्ही कमी असल्यास पाणी घालुन घट्ट होईपर्यंत शिजवा.पावावर बटर लावा आणि पॅनच्या दोन्ही बाजूंनी बेक करा.मिसळची ग्रेव्ही प्लेटमध्ये काढुन त्यावर चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव आणि लिंबू घालून सर्व्ह करा.

टिप्स
उसळ बनवण्यासाठी तुम्ही मिक्स उसळ देखील घेऊ शकता. याशिवाय फरसाणाऐवजी चिवडाही वापरता येतो.

Author:-Mrs. Swati Dhas Kshirsagar

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *