Moong Dal Dosa Recipe In Marathi language

Moong Dal Dosa Recipe In Marathi | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा

Moong Dal Dosa Recipe In Marathi language | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा
आरोग्यदायी रेसिपी या शक्यतो चवीला हव्या तशा नसतात. पण आज आपण अशी रेसिपी बघत आहोत जी खायला देखील अतिशय चविष्ट आहे आणि आरोग्यदायी सुद्धा आहे घरातील लहान-मोठे सर्व हा मूग डाळ डोसा अगदी आवडीने खातील यात शंका नाही. मूग डाळीमध्ये प्रथिनांचा भरपूर स्त्रोत असतो त्यात उत्कृष्ट पद्धतीने अमिनो ऍसिड आढळते शिवाय फायबर लोह मॅग्नेशियम या गोष्टी मूगडाळी मध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. जीवनसत्वे आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात मूगडाळीमध्ये असतात जे आपल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक घटक आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुडाई मध्ये कॅलरीज अत्यंत कमी असतात. मूग डाळीमुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवता येते. चला तर मग बघूया ही रेसिपी.

Moong Dal Dosa Ingredients

दोन वाट्या मुगाची डाळ , दोन हिरव्या मिरच्या , दोन ते तीन लवंग , लसणाच्या पाकळ्या , एक लहान आल्याचा तुकडा , दोन मध्यम आकाराचे कांदे , अर्धा कप कोबी , गाजर गरजेनुसार , स्वीट कॉर्न पन्नास ग्राम , शिमला मिरची , सेंधव मीठ , ऑलिव्ह ऑइल , रेड चिली सॉस , सव्वाशे ग्रॅम पनीर

Recipe

ही रेसिपी आदल्या रात्रीपासून चालू होते कारण की मुगडाळ आपल्याला रात्रभर भिजत ठेवावी लागते

सकाळी उठून भिजवलेली मुगडाळ हिरवी मिरची आणि आले एकत्र मिक्सरमधून काढून त्याची घट्ट पेस्ट तयार करून घ्या

Green Moong Dal Dosa Recipe In Marathi language | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा

Green Moong Dal Dosa Recipe In Marathi language | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा

सर्व भाज्या बारीक चिरून घ्या

एक pan घ्या त्याच्यामध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल टाकून त्यात कांदा आणि लसूण घालून तो गरम करा

हे सर्व चांगले गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये गाजर पनीर आणि कोण घाला आणि मध्यम गॅसवर त्याला शिजवायला ठेवा

आता यामध्ये कोबी टाकून पाच मिनिटांपर्यंत शिजवत ठेवा

यानंतर तुमच्या गरजेनुसार मीठ केचप आणि रेड चिली सॉस टाका आणि सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्या

Green Moong Dal Dosa Recipe In Marathi language | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा

यानंतर पिठामध्ये मीठ घालून ते बाजूला ठेवा. आता डोशासाठी तवा गरम करायला ठेवा.

तव्यावरती थोडे तेल टाकून त्यावर ती मूग डाळ पीठ टाकून त्याला डोशाचा आकार द्या

डोसा दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या आणि त्याच्यामध्ये भाजी भरून त्याला व्यवस्थित आकार द्या

अशाप्रकारे तुमचा टेस्टी गरम गरम आणि हेल्दी मुगडाळ डोसा भाजी सोबत तयार आहे.

Green Moong Dal Dosa Recipe In Marathi language | हेल्थी नाश्ता मूग डाळ डोसा

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *