Mrutynjay Karn Kavita in 2024

दानशूर कर्ण | best Mrutynjay Karn Kavita in 2024

संगीता पोरे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Mrutynjay Karn Kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Mrutynjay Karn Kavita in 2024

काव्यतालिका
रविवारीय काव्यस्पर्धा

दिनांक : ०३|०३|२०२४

दानशूर कर्ण | Mrutynjay Karn Kavita in 2024

सूर्यपुत्र तू
कुंतीपुत्र तू
सहावा पांडव जरी
राधेयही असशी तू

दुर्योधनाचा सखा
वृषालीचा पती
वृषसेनाचा पिता जरी
अर्जुनासम धनुर्धर तू

मातेने जळी वाहिले
गुरूनेही नाकारले
धनुर्विद्या एकलव्यापरी
शिकलास तुझाच तू

हिणविती तुज सूतपुत्र
ऐकताच तप्त कानशिले
नजर अभेद्य ठेवूनिया
पाहशी सूर्यास तू

ओंजळ कधी ना रिक्त कुणाची
कुणी मागावे अन् तू द्यावे
स्वप्नीच्या इंद्र याचकाप्रती
वचनबद्ध जरी निद्रिस्त तू

प्राणाहूनही सत्य वचन ते
भिक्षुक बनूनी इंद्राने यावे
कवचकुंडले उतरवूनी त्याच्या
हाती देशी सहजपणे तू

रण पेटले समरांगणी
माता कुंती येई धावुनी
आजवरी ना आठवण तिजला
म्हणे माझाच पुत्र तू

कपट समजले जरी तुला
परी माता म्हणूनी आदर करिशी
पाच पांडव असतील तुझेच गं
आश्वस्त तिजला करिशी तू

भविष्य दिसे अन् कृष्णलीलाही
मैत्रीत तुझ्या बाधा ना येई
रथचक्राने घात करूनीही
अखेरपर्यंत लढलास तू

दिले वचन मातेला पाळून
प्राणार्पण करिशी रणांगणी
मैत्रीसाठी बलिदान तुझे रे
आठवशी तू क्षणोक्षणी असा
दानशूर कर्ण तू
दानशूर कर्ण तू

सौ.संगीता पोरे
माळशिरस, सोलापूर

Mrutynjay Karn Kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *