Mazi Mulgi Marathi Kavita On Daughter | लेकीसाठी मुलीसाठी मराठी कविता | Lek Marathi Poem
१)
होता जन्म लेकी तुझिया
झाला समूळ जीवनात बदल
सौख्य आले घरा जणू
फुलला चिखलात सुंदर कमल
२)
पडता पाऊल लेकीचे
लागे पैशांचा झरा
साक्षात लक्ष्मी देवी
जणू येती घरा
३)
चिमुकलीच्या ओठांमधूनी
जवा निघे शब्द मधुर
पडताच कानी मजला मग
त्यासी नसे सुखाची धुर
४)
मागच्या जन्माची पुण्याई जणू
आम्हास झाली मुलगी नेक
लाखात असेल मुलगा तुझीया परी
मुलगी माझी अनंतात एक
Mazi Mulgi Marathi Kavita On Daughter | लेकीसाठी मुलीसाठी मराठी कविता | Lek Marathi Poem

५)
वंशाच्या दिव्या पोटी
विझविल्या कैक पणत्या
हाकलून देता घराबाहेर त्याने
फिरे माय बाप वण वणत्या
६)
कधी आज्जी
तर कधी ताईच झाली
सावली बनून माझिया
मुलगी माझी आईच झाली
७)
अश्रू दिसताच डोळीया माझ्या
पुसावया तिचा हाथ येतो…
रडवया चेहऱ्याला हसवाया
मुलीचा साथ असतो..
८)
चेहरा दिसताच मुलीचा
दुःख सारे हरवूनी जातात
सुखाच्या पावसात जणू
मजला भिजवूनी जातात
Mazi Mulgi Marathi Kavita On Daughter | लेकीसाठी मुलीसाठी मराठी कविता | Lek Marathi Poem
९)
नको मजला वंशाचा दिवा
प्रकाश देणारी पणती हवी
आनंदाची हवा जणू
घरा-घरात खेळती हवी
१०)
खेळता खेळता तुझ्या संगे
पोरी दिवस कसे गेले कळलेच नाही…
लहानशी चिमुकली आमुची
मोठी झाली हे कधी कळलेच नाही…
११)
ओढ तुला आता
लागली जावाया सासरची
अन् पोरी मला चिंता
वाटली तुझ्या आयुष्याची…
Mazi Mulgi Marathi Kavita On Daughter | लेकीसाठी मुलीसाठी मराठी कविता | Lek Marathi Poem
१२)
लाडाने वाढवलंय तुला पोरी
असच कुणाच्याही हाती देऊ शकणार नाही
म्हणूनच सतत चिंता असे मजला
तुझा संसार मी दुःखात जाऊ देणार नाही
१३)
बघुनिया सोज्वळ मुलगा
बांधीतो मी गाठ तुझ्या लग्नाची
पोरी स्वीकार कर भेट अमुची
अन् चालव गाडी सुखात संसाराची
१४)
संसारी जातांनाही मुलीने
सोडलं नाही माझा हाथ
अगं रडते कशाला पोरी
मी नाही सोडणार साथ
१५)
डोळ्यात आपसुकच अश्रू येतात
निरोप पोरीला देतांना
हाताच्या फोडा प्रमाणे वाढवून तिला
दुसऱ्याच्या हातात सोपवतांना
१६)
ओझं न्हवती पोरगी माझी
समाजाने अशी विकृत परंपरा लादली
म्हणोनिया आपल्या पोटच्या गोळ्याला
अनोळखी असलेल्या दुसऱ्यांच्या पदरात बांधली
Mazi Mulgi Marathi Kavita On Daughter | लेकीसाठी मुलीसाठी मराठी कविता | Lek Marathi Poem
बाप कविता | माझा बाप | Baap Kavita Marathi
प्रिय व्यक्तीसाठी आठवण कविता वाचण्यासाठी क्लिक करा
Pingback: MARATHI KAVITA ON MARRIAGE | लग्न म्हणजे काय असते ? 8 कविता
Pingback: Savitriba Fule Information in Marathi | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी 800 शब्दात निबंध