nature poem meaning in marathi

वसंत ऋतू आणि प्रेम वंसंत | 2 Best nature poem meaning in marathi

विजय तानाजी पाटील आणि श्री दत्तात्रय नामदेव गुरव यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत nature poem meaning in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

nature poem meaning in marathi

काव्यबंध समुह आयोजित काव्यतालिका रविवारी स्पर्धा.
दि.5/11/2023

विषय: -हदयी वसंत फुलताना

वसंत ऋतू | nature poem meaning in marathi

वसंत ऋतू आणि प्रेम वंसंत | 2 Best nature poem meaning in marathi

नर कोकिळस लागे,
वसंत ऋतूची चाहूल..
देई कोकिळेस,
कुहू कुहू ची भूल…

संपला शीतल शिशिर,
आता वाट पाहण्याचा..
घेऊन येई वसंत,
ऋतू जोडीदार भेटण्याचा…

आठवणीस नसे तिच्या,
मज मनी आता उसंत..
स्मृतीस्पर्शाने तिच्या ,
फुले हृदयी वसंत…

येई पानाफुलास,
आसमंती रंगीबेरंगी बहार…
मज हृदयात होई,
तिच्या प्रीतीचा जागर…

फुललेला गुलमोहर,
घाली लाल फुलांचा सडा..
वाटे पाही वेड्या युगुलाची,
देत पहारा खडा…

प्रेमऋतूची आता वाट,
पाहे मी नेहमी…
तो आला बहरूनी,
फक्त तुझीच कमी…

अजूनही फुले हृदयी मज,
तुज प्रेमाचा वसंत..
पण तू आलीच नाही,
राहीली या जन्मी खंत..

आयुष्याच्या शेवटी तरी,
हृदयी पुन्हा वसंत फुलावा तुझ्या..
हीच वेड्या मनी,
आशा असे अजुनी माझ्या…

✍️विजय तानाजी पाटील (तासगाव )✍️

nature poem meaning in marathi

काव्यबंध समुह आयोजित काव्यतालिका रविवारी स्पर्धा.
दि.5/11/2023

विषय: -हदयी वसंत फुलताना

प्रेम वसंत | nature poem meaning in marathi

(शब्द संख्या: १०५ )

प्रेम वंसंत | 2 Best nature poem meaning in marathi

हृदयी वसंत फुलताना
प्रेमास सुगंध आला
अनोळखीचा तुझा धागा
प्रेम बंधाने सखे जोडला…१

गालावरी बटांना सावरीत तू
बोलतेस मधाळ वाणीत
माझे कर्णमधुर तृप्त झाले
अलवार बिलगलीस प्रेम हृदयात …२

हृदयी वसंत फुलताना
कळ्यांची झाली फूले
सुगंधी बाग आहेस तू
तुझ्याच सुंगधाने जाणिले…३

संचारला मनात माझ्या राग भैरवी
संगितात जीव मनोमन हा रमला
हृदयी वसंत ऋतू फुलताना
सप्त सुरांनी तार छेडीला…४

सहा ऋतूंचे सहा सोहळे
मनी प्रेम रंग भरला
वसंताचे आगमन होताच
हृदयी नकळत वसंत फुलला…५

मनोमन मिलन झाले
गंध फुलांचा गेला सांगून
हृदयी वसंत फुलताना
प्रीत ही आपुली आली बहरून…६

अशीच राहू दे प्रीत आपली
सखे बांधल्यात आता जन्मांतरीच्या गाठी
हृदयी वसंत फुलताना
होत राहतील आपल्या गाठीभेटी…७

श्री.दत्तात्रय नामदेव गुरव
कोल्हापूर.

Best nature poem meaning in marathi

nature poem meaning in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *