navratri kavita in Marathi Language

भक्तीची महिमा आणि जागर | 2 Best navratri kavita in Marathi Language

श्रीनिवास रामचंद्र असलेकर आणि सौ. भारती राजेंद्र बागल यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri kavita in Marathi Language विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

navratri kavita in Marathi Language

काव्यबंध समूह आयोजित
काव्य लतिका
विषय- नवगत्री
-दिनांक- ८/१०/२०२३

भक्तीचा महिमा | navratri kavita in Marathi Language

भक्तीची महिमा आणि जागर | 2 Best navratri kavita in Marathi Language

नवरात्रीला देवीची घटस्थापना होते
मातीच्या आसनावर कुंभ ठेवतात
विविध प्रकारचे धान्य टाकतात
काहीं दिवसात अंकुर फुटतात

पहिल्या माळेला शैलपुत्री आली
तिचे रूप फारच सुंदर
असे ती धर्मात महान
करू या तिला वंदन

दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी
जपमाळ धरलीय हातात
डाव्या हातात धरी कमंडलू
आली सुख घेऊनी घरात

तिसऱ्या माळेला आली चंद्रघटा
रुप तिचे दिसे साजिरे
भक्तांसाठी येई सत्वर
सर्वांसाठी आहे गोजिरे

चवथ्या माळेला कुष्मांडा माता
विश्वाची ती आहे देवता
नव निर्मिती तिच्या ठायी
म्हणून तिला येते भेटता

पाचव्या माळेला स्कंदमाता
सिंहावर आरूढ होऊन आली
शौर्य धैर्य तिच्या ठायी
प्रसन्न वदनाने आली घरी

सहाव्या माळेला कात्यायनी
भक्तांसाठी धावून येई
सुख समृद्धीची आहे देवी
तिच्या भक्तीने ती यश देई

सातव्या माळेला कालरात्री
कुमारिका पुजती मनोमनी
मनासारखा वर मिळू दे
कालरात्री यश देई क्षणोक्षणी

आठव्या माळेला महागौरी
सर्व भक्तांची आवडती
प्रेमभावे आळवावे तिला
सफेद वस्त्र धारण करी

नवव्या माळेला सिध्दीदात्री
इच्छापूर्ती होईल खास
गरजेपेक्षा जादा नको
लोभ नको हाच धरा ध्यास

श्रीनिवास रामचंद्र असलेकर
कण्हेरी ता खंडाळा जि सातारा

navratri kavita in Marathi Language

काव्यबंद समूह आयोजित
काव्य लतिका स्पर्धा
दिनांक 8 ऑक्टोंबर 2023

विषय नवरात्री

जागर | navratri kavita in Marathi Language

जागर | 2 Best navratri kavita in Marathi Language

नवरात्री उत्सव
काली दुर्गा अंबेचा
महिषासुराचा वध करणाऱ्या
महिषासुर मर्दिनीचा

दुष्टांचा करते संहार
काली कालरात्री होऊनी
जग रक्षणासाठी येते
नाना रूपे घेऊनि

नवरात्री नऊ दिवस
सोहळा हा आनंदाचा
ब्रह्मचारिणी कुष्मांडा
जगतजननी सिद्धीदात्रीचा

नऊ दिवस नवरात्र
जागर माझ्या भवानीचा
महालक्ष्मी चामुंडा
अष्टभुजा धारिणीचा

रौद्ररूप घेऊनी
करते असुरांचा संहार
आनंदे स्वीकारते
भक्त कल्याणाचा भार

शैलपुत्री गिरी कन्या
ब्रह्मचारिणी कात्यायनी
दृढ विश्वास भरते
नित्य भक्ताच्या मनी

स्कंदमाता महागौरी
नवदुर्गेची रूपे न्यारी
आदिशक्तीची कृपादृष्टी
नित्य आपल्या भक्तावरी

चंद्रघंटा चामुंडा
नाना रूपे देवीची
अनन्य श्रद्धा तिच्यावरी
श्रद्धाळू भक्ताची

भजन पूजन जागर
जल्लोषाचे वातावरण
रात्र रात्र चाले गर्भा
प्रसन्नतेने भरे मन

अतिरेक होता दुष्ट शक्तींचा
नाना रुपात अवतरते दुर्गा
प्राण लावूनी पणा
तारीते जगा

नवरात्रीच्या उत्सवाची
लागते तना मनाला ओढ
अविस्मरणीय क्षण हे
नित्य वाटतात गोड

अश्विन शुद्ध प्रतिपदेला
होता मातेचे आगमन
ऐकून कीर्ती तिची
वाढते आत्मबळाचे धन

साद ऐकुणी निरापराध्याची
माते क्षणात तू यावे
विनवणी एवढी तुला
अभय त्यास द्यावे

सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा

navratri kavita in Marathi Language

Best navratri kavita in Marathi Language

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *