navratri kavita in marathi

नवरात्री आणि नवरात्राचे सोहळे | 2 Best navratri kavita in marathi

अनुया काळे आणि मंगल राजाराम यादव यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

navratri kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक उपक्रम
काव्यलतिका स्पर्धा
दिनांक 8 ऑक्टोबर 2023 विषय: नवरात्री

नवरात्री | navratri kavita in marathi

नवरात्री आणि नवरात्राचे सोहळे | 2 Best navratri kavita in marathi

महिषासुरमर्दिनी
आदिमाया आदिशक्ती
ताप त्रिविध जळती
साधी भोळी माझी भक्ती

घट भरला भरला
चाले देवीचा जागर
परंपरा जपूया गं
चला फुंकू या घागर

सृष्टी भरली भारली
लागे चाहूल सुगीची
शिवारात लयलूट
धनधान्य जिनसांची

नऊ दिस नऊ रूपे
अखंडित चाले यज्ञ
नारीशक्तीचे पूजन
होऊ नमुनी कृतज्ञ

भोवताली लेकीबाळी
जर सुरक्षित नाही
व्यर्थ भजन कीर्तन
फक्त सोपस्कार होई

बाई बाईचा करिते
मनातून रागद्वेष
आणि देवीला भजते
सोसूनिया आत्मक्लेश

घरातच दुर्गा देवी
लक्षुमी नि सरस्वती
तिला सुखी ठेवुनीया
देवदेवता पावती

नवरात्रीचा सोहळा
गावोगावी घरोघरी
आशीर्वाद देण्या देवी
अवतरते भूवरी

काम क्रोध मोहमाया
अंतरीचे अवगुण
निर्दालन करी त्यांचे
नेई मजसी तारुन

प्रार्थना हे जगन्माते
घुमू दे गं ललकारी
जाग्या होऊ दे शिकू दे
दरीडोंगरीच्या नारी

अनुया काळे
मुरबाड ठाणे

navratri kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धा
दि८/१९/२०२३.
विषय-नवरात्र.

नवरात्रीचे सोहळे | navratri kavita in marathi

नवरात्राचे सोहळे | 2 Best navratri kavita in marathi

नवरात्रींचे न ऊ सोहळे,
न ऊ दिवस रंग वेगळे
उपासना स्त्री शक्तीची,
रूप अंतरिक उर्जेचे निराळे,..१

स्वरूप पहिले शैलपुत्री,
जात, धर्म भेदभाव,
नष्ट करून एकरूप ,
जगात निर्माण व्हावा आदरभाव…२

स्वरूप दुसरी ब्रम्हचारिणी,
अंधश्रद्धा, अशुभ चालीरिती,
समाजातून व्हावे त्यांचे उच्चाटन,
घडावी उत्तम संस्कारित नीती…३

स्वरूप तिसरी चंद्रघटा,
उत्तमोत्तम साध्य कराव्या,
पावित्र्य जपावे छान
उत्सव महान व्हावा….४

गतीशील जीवनाची द्योतक,
नवनवीनतेचा घ्यावा ध्यास,
प्रगती करून साधावा विकास
भय संकटांचा करावा नाश…५

मंगल राजाराम यादव.
शिराळा.जि सांगली.

navratri kavita in marathi

Best navratri kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *