navratri marathi banner with poem

देवी शक्ती उपासना आणि नवदुर्गा नवशक्ती | 2 best navratri marathi banner with poem

अनंत तेलंग आणि मोहिनी डंगर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi banner with poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

navratri marathi banner with poem

काव्य बंध समुह आयोजित साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक. ८/१०/२०२३
विषय : नवरात्री
शब्द संख्या -१२८

देवी शक्ती उपासना | navratri marathi banner with poem

देवी शक्ती उपासना आणि नवदुर्गा नवशक्ती | 2 best navratri marathi banner with poem

नवरात्री नऊ दिवस
आनंदाचे भक्ती साठ,
प्रसन्नतेची असे लहर
नव दुर्गा सप्तशती पाठ…१

नऊ दिवस नऊ रात्री
देवी शक्तीचा जागर,
घरीच आहे नवदुर्गा
माना स्त्री शक्ती आदर..२

आश्विन शुद्ध प्रतिपदेला
आरंभीचा असे मान,
शक्ती स्वरूप हेच मान्य
सुहासिनी पुजन सन्मान..३

नवचैतन्य पसरे आकाशी
नवरात्रीच्या दिवसात,
सृष्टीच्या या कालचक्रा
नवचैतन्याची बघा प्रभात..४

देवी शक्ती नमो नमः
या देवी सर्व भूतेषु ,
संकटकाळी धाव घेई
भक्तजना ठेव सुखेषु..५

नव दुर्गा नवरात्री काल
देवी शक्ती ची साधना,
मन माझे दंग होई
करुया सारे आराधना ..६

नवरात्रीच्या उत्सवातून
पुजन करा स्त्री शक्तीचे,
घरातील गृहलक्ष्मीचा
भक्ती साधा हे सौख्याचे..७

देवी शक्ती उपासना
मानवी मनाला लोभस,
आंतरिक ओढ लागते
सुहासिनी सौंदर्य तेजस..८

दिव्य तेजाने नवरात्री
आठवण राहे औक्षणी,
कुलस्वामिनी जगदंबा
वंदन करुया क्षणोक्षणी ..९

शारदीय नवरात्रौत्सव
नऊ दिवसांचे घटी साधक,
मौन, आनंदाचे व्रत साधा
अध्यात्मिक शक्ती उपासक १०

@अनंत तेलंग
देऊळगांवराजा
जिल्हा बुलढाणा

navratri marathi banner with poem

” काव्य बंध समूह”आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार.
काव्यलतिका….स्पर्धा.

दि.०८/१०/२०२३

विषय…नवरात्री.

नवदुर्गा नवशक्ति | navratri marathi banner with poem

 नवदुर्गा नवशक्ती | 2 best navratri marathi banner with poem

खंबीर,निडर शांत होईन
भटकणारे मन तुझ्या चरणी वाहीन
होईन तुज सम माता शैलपुत्री
पाषाणा प्रमाणे प्रतिबद्ध राहीन

ब्रम्हचर्य तू दे मजला
अनंत अस्तित्वाची जाणीव या जिवाला
ज्योति स्वरुप तू ब्रम्हचारीणी
सजगतेसह जीवन दे मला

मानवी मन म्हणजे चंद्र नभातला
घंटेच्या नादाने वर्तमानात गुंतला
प्रतीक तू मन आकर्षकतेची चन्द्रघण्टा
तुझीया नामस्मरणे चित्त शांत झाला

कुष्मांड म्हणजे कोहळा
अनंत अस्तित्वाचा सोहळा
कुष्मांडा सामावी विश्व तिच्या उदरी
पुनरुत्पादनाची दावे लीला

सिंहावर आरूढ होऊन आली
शौर्य, करुणेची द्योतक झाली
कार्तिकेय ची आई स्कंदमाता
तुझ्या स्मरणे निरागसता लाभली

सुख समृद्धी प्रदान करी
आत्म समर्पण करी त्यास तारी
महर्षि कात्यायनच्या घरात जन्मली कात्यायनी
उपासनेने भक्तांचे दुःख दरिद्र हरी

काल असे सर्वाचा साक्षी
रात्र असे गाढ विश्रांती चि
कालरात्रि होई पुन्हा कार्यक्षम
कुमारिका पूजती वर प्राप्तीसी

सफेद रंग प्रतीक शुद्धतेचे
निरागसतेने शुद्धता येते
महागौरी देई उच्चज्ञान जीवनाबाबत
विद्वत्ता दे आई तुला आराधीते

सिद्धि देई सिद्धिदात्री
इच्छापूर्तिची असे खात्री
लोभ नसावा गरजेपेक्षा
होईल नष्ट एकाच रात्री

मोहिनी डंगर
रायगड

navratri marathi banner with poem

2 best navratri marathi banner with poem

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *