navratri marathi message in txt

विश्वाची पालनकर्ती आणि आराधना | 2 Best navratri marathi message in txt

अब्दुल करीम शमशुद्दीन सय्यद आणि सौ. सुवर्णा विश्वास पवार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi message in txt विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

navratri marathi message in txt

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
विषय : नवरात्री
दि : ८/१०/२३

विश्वाची पालनकर्ती | navratri marathi message in txt

विश्वाची पालनकर्ती आणि आराधना | 2 Best navratri marathi message in txt

आहे विश्वाची पालनकर्ती
नऊ रुपी दुर्गा माता
करु मनो भावे पूजन
नवरात्र उत्सवात आता.. १

भक्ती भावाने पूजन करती
माता भगिनी अनवाणी
घटोत्सवात निर्जल उपवास
न अन्न घेती ना पाणी…… २

नारंगी केशरी वस्त्रात
करु शैलपुत्रीची पूजा
सकारात्मक आनंद अन्
रंग रुपाची ऊर्जा….. ३

ब्रम्हचारिणीची भक्ती
करु पांढऱ्या रंगात
शुद्धता, ताजेपणा, शांतता
सुरक्षेची भावना अंगात…… ४

चंद्रघटेचे रुप गोजिरे
खुले रंगात लाल
लाल ओढणी प्रिय मातेस
उत्साह चैतन्याचा महाल….. ५

कष्मांडा देवीचे गुण
आनंदाचा रंग निळा
अतुलनीय हर्ष समृध्दी
सूर शांततेचा गळा…. ६

स्कंद मातेचा वेगळा
पिवळ्या रंगात थाट
उबदारपणाचे प्रतिक आणि
आनंदाची रेशमी पहाट.. ७

कात्यायनी देवीची आहे
हिरव्यागार रंगात शान
प्रतिक निसर्गाचे शांतीचे
तिथे फुले नारळास मान… ८

माता कालरात्री धावली
सुंदर राखाडी साडीत
संतुलित विचारांचे दिप
सप्तधान्य तोरणांच्या गाडीत..९

राजेशाही ढंगाची महागौरी
रंग जांभळा आशावादी
भव्यता दिव्यता तेज
आनते आबाद आबादी… १०

सिध्दिदात्री नाचत आली
नेसूनी मोरपंखी वस्त्र
मंगल कलश डोक्यावर
हाती आसुरासाठी शस्त्र..११

नऊ रंगात न्हाऊन निघाली
दुर्गा मुक्कामी घटात
अब्दुल भक्ताला पाव न माते
गातो गुणगान तुझे थाटात..१२

अब्दुल करीम शमशुद्दीन सय्यद
पंढरपूर
७०३८३१३२३५

navratri marathi message in txt

स्पर्धा करीता
काव्यबंध समूह
काव्यलतिका
प्रत्येक रविवारची स्पर्धा
दि .८ ऑक्टों . २०२३
विषय = नवरात्री

आराधना | navratri marathi message in txt

आराधना | 2 Best navratri marathi message in txt

नवरात्रीला देवीची करू घटस्थापना,
नवदुर्गा कुलदेवीची शुभ आराधना.

कुंकुम अर्चना करू भरू आईची ओटी,
अंबाबाई माता स्तुती तुझी माझ्या ओठी.

तुझ्या भक्तीचा जागर तुझी उपासना,
करीते भक्तांचे पूर्ण तूच मनोकामना.

करूया पुजन नऊ तुझे अवतार ,
चंडीका बनूनी करी दुष्टांचा संहार.

संकटात धाव घेई होई शंख घंटानाद ,
भक्तांना तू पावशी घालता तुज साद.

शिवगौरी देवी कर तिचे असे चतुर्भूजा,
शंख नि पंकज,करी गदा,चक्र दुजा.

कमला आसन माता सिध्द आदीशक्ती,
भक्तीभावाने करू पुजा बल देई दुर्गाशक्ती.

दुर्गा मातेचे पुजन माळ रोज बांधुया,
कार्य सिद्धी वर देई नमन तिज करूया.

गदर्भावर बैसूनी आली त्रिनयनी कालरात्री,
तंत्र साधक,अग्नी कालिका सिध्दी अधिष्ठात्री.

नवदुर्गा स्कंदमाता सिंहारुढ शाकंभरी ,
तेजपुंज वलय आभा शोभे पंकज करी.

दुर्गा रूप कात्यायनी तलवार अभयमुद्रा ,
त्रिदेव देवता अंश धारण कमलपुष्प वरमुद्रा.

नवरात्री मातेची करी मनोभावे पुजा भक्त,
रोग,भय,दुःख,संताप माता करी तया मुक्त .

सौ .सुवर्णा विश्वास पवार , इचलकरंजी
मो . नं . ९९६०३०१४०८

Best navratri marathi message in txt

navratri marathi message in txt

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *