कु. उज्वला धांडे आणि सौ. पुष्पा सदाकाळ भोसरी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi message विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
navratri marathi message
काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
विषय : नवरात्री
दिनांक : ०८/१०/२९२३
शिर्षक : अष्टभुजाधारी

नवरात्र काव्यव्रत
सोळा हाताचा मंडप
सिंहारूढ वेदीवर
अष्टभुजा धारी जप
शैलपुत्री अवतरली
बैल नंदी विराजली
महाकाली अवतार
सती परत जन्मली
ब्रह्मचारी ती योगिनी
मुक्ती शांती अस्तित्वाची
हाती कमंडल असे
तेजोमय कर्तृत्वाची
चंद्रघंटा आकर्षक
भाळी अर्धचंद्र सजे
शौर्यगाथा तुझी चोहो
चैतन्याचा मान धजे
विश्व सर्जन स्वामिनी
आरूढली वाघावर
अष्ट कर ती कुष्मांडा
हक्क तुझाच सृष्टीवर
कार्तिकेय स्कंदमाता
वाचवण्या बाळा लढे
चतुर्भुजा पुत्र धरी
सिंहावरी रण चढे
कात्यायनी योद्धा देवी
रुप त्रिदेवी घेतले
जप करता रागिनी
विघ्न संकट विरले
सुंभ निसुंभ मारिले
कालरात्री अग्निमय
केला संहार दृष्टांचा
मुक्त क्षण दु:खमय
ज्ञानीवंत महागौरी
शुभ्र रंगाची मलिका
कन्या पूजती आस्थेने
रूप पार्वती चंडिका
सिद्धीरात्री देई खात्री
विसावली अब्जावर
अर्धनारीश्वर रूप
माया तुझी भक्तांवर
कु. उज्वला धांडे
नागपूर
navratri marathi message
काव्यबंध समूह आयोजित (काव्यलतिका)
दर रविवारी होणारी दीर्घ काव्य स्पर्धा…..
विषय …नवरात्री..
शीर्षक जोगवा | navratri marathi message

उदो उदो करीत अंबेचा
जोगवा जोगवा मागते आईचा….
अंबा माझी गं सत्वाची
आस केवढी ती भक्ताची
तिच्या वा-याला वा-याला
नाद लागतो संबळाचा.
उदो उदो करीत अंबेचा
जोगवा मागते भवानीचा…
परडी तुझी गं हातावर
कृपा बरसू दे संसारावर
तुझ्या पुढ्यात पुढ्यात
गोंधळ चालतो वाघ्या मुरळीचा..
उदो उदो करीत अंबेचा
जोगवा मागते आईचा…
गळा शोभे कवड्यांची माळ
सुखी ठेव माय माझं बाळं
तुझ्या मुखात मुखात
विडा रंगतो पानांचा…
उदो उदो करीत अंबेचा
जोगवा मागते भवानीचा..
कुंकवानं भरलया लल्लाट
उद कापुराचा बाई घमघमाट
तुझा शृंगार शृंगार
फेडतो पारणे डोळ्यांचा..
उदो उदो करीत अंबेचा
जोगवा मागते आईचा ….
तुझ्या भेटीला येते बाई नेमानं
उर भरतो भरतो आनंदानं
तुझ्या डोंगरी डोंगरी
लखलखाट दीवट्या बुधल्यांचा..
उदो उदो करीत अंबेचा
जोगवा मागते भवानीचा..
हळदी कुंकवाचं लेणं
नाही पडावं त्याला उणं
तुझ्या नादात नादात
विसर पडतो दुखाःचा.
उदो उदो करीत आईचा
जोगवा मागते अंबेचा..
आई अभय दे तू बळ दे
प्रकाशण्या तिमीर ही दे
माझ्या पदरात पदरात
नारळ पडूदे आशिर्वादाचा..
उदो उदो करीत भवानीचा
जोगवा मागते अंबेचा..
..
..
सौ.पुष्पा सदाकाळ भोसरी✍️ पुणे
navratri marathi message

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह