स्त्री शक्तीचे जागरण आणि नवरात्री | 2 Best navratri marathi quote

अरविंद कुळकर्णी आणि सौ. प्रतिभा शिरोडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi quote विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

navratri marathi quote

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा दि.८/१०/२३

विषय – नवरात्री

स्त्री शक्तीचे जागरण | navratri marathi quote

स्त्री शक्तीचे जागरण आणि नवरात्री | 2 Best navratri marathi quote

नवरात्री महोत्सवी प्रारंभी
पहिली माळ घटस्थापना
आरतीला येती सारे भक्त
जगदंबेची चाले आराधना…(१)

देवीच्या या नवरात्रात
लावू नंदादीप अखंड
तेजाचे प्रतीक तो दीप
कुठे पडो न त्यात खंड…(२)

स्त्री शक्तीचे जागरण
घरोघर बसते नवरात्र
नकारात्मक ऊर्जा जाते
आनंदी वातावरण सर्वत्र…(३)

नवरात्रीच्या महोत्सवात
करा सर्वांनी नक्की चिंतन
आगळी वेगळी असे नारी
तिलाही भाव भावना व मन…(४)

नवरात्रीचे नऊ रंग खरोखर
घेऊन येती उत्साह जीवनात
परिसरात असंख्य धूप दीप
दारी रांगोळी सजली अंगणात…(५)

अष्टभुजा देवी शस्त्रधारी
असूरी शक्तीचा करी नाश
समाजात जावू द्या संदेश
वाईट प्रवृत्तीचा तोडू पाश…(६)

आरती,गोंधळ,जोगवा होई
दुर्गा सप्तशती पाठ आवर्तन
नऊ दिवस उपवास भक्तांना
करी भजन,पूजन,होमहवन…(७)

नंदादीप देतो एक प्रेरणा
इतरांना स्वयंप्रकाश वाटा
तेवत राहो संस्कार दीप
दृष्ट विचारांना दया फाटा…(८)

नवरात्री सोहळ्याची सांगता
करून विजया दशमी सण
सोने लुटून, शुभेच्छा देऊन
करूया आनंदाची उधळण…(९)

अरविंद कुळकर्णी
मलकापूर
जिल्हा – बुलडाणा

navratri marathi quote

काव्य बंध समूह आयोजित
साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक 8/10/2923

नवरात्री | navratri marathi quote

नवरात्री | 2 Best navratri marathi quote

आला आला ग नवरात्र
करू या नऊ
देवींचे गुणगान
पहिल्या माळेला आली दुर्गा
भरली मंदिरात देवींची सभा
गजर करते तुझा ग दुर्गा


दुसऱ्या माळेला आली भवानी माता
सगळे जमले मंडळी भक्त माता
पेड्यांचा नैवेद्य दाखवते तुला आता
तिसऱ्या माळेला आली चंडिका माता
दाखवले चंडिकेने रुद्र रुपये आता
दैत्यांना मारिले तु चंडिका माता
चौथ्या माळेला आली कालिका माता
दैत्याला पायाखाली दाबूनी मारिले माता
पाचव्या माळेला आली भवानी माता भवानी माता म्हणून पूजा करते माता
सहाव्या माळेला आली संतोषी माता आंबट चिंबट नाही खाणार ग माता गूळ फुटाण्यांचा प्रसाद वाटेल

ग माता
सातव्या माळेला सप्तश्रुंगी माता
अष्ट भुजा तुला ग माता
खण नारळाची ओटी तुझी भरेल ग माता
आठव्या माळेला कुलस्वामिनी ग माता
साडी चोळीचा आहेर ग तुला करेल ग माता
नवव्या माळेला नवर्ण देवींना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवेल ग माता
दसऱ्याला शिलाणगान खेळून येशील ग माता
बोला भवानी माता की जय

सौ. प्रतिभा शिरोडे

navratri marathi quote

2 Best navratri marathi quote

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *