विद्या प्रधान आणि सौ. स्वरूपा कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi text png विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
navratri marathi text png
काव्यबंध समुह
आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार आयोजित काव्यलतिका ८/१०/२०२३ विषय:- नवरात्री.
वरदान | navratri marathi text png

शुद्ध अश्विनचा मास
नवरात्री महोत्सव
सिंहासनी आरुढस्थ
देवी अंबेचा उत्सव.
१
झेंडू फुलाचे तोरण
नक्षी रांगोळीची खास
तबकात निरांजन
स्वागतार्थ औक्षणास
२
घट बसवू देवीचा
झेंडू माळ घटावर
बीजांकूर सभोवती
सजे सुंदर मखर. ३
शोभे आसनात छान
गळा वस्त्र कापसाचे
अलंकार मनोहर
लावू कर्पूर वासाचे.
४
हिरवाई पर्णपत्री
मोग-याचा कंठीहार
तेजाळते मूर्ती रूप
नेत्री झळाळी अपार
५
नऊ रूपे नऊ दिनी
आदिमाया आदिशक्ती
कुंकू लाल पूजनात
करू मनोभावे भक्ती. ६
सुवासिक सुगंधित
चाफा अत्तर शिंपले
वाटे प्रसन्न घरात
सभोवती गंधाळले.
७
सगळ्यांना ठेवी सुखी
माझ्या भारत देशात
कुणासही नको दु:ख
सारे राहो आनंदात.
८
उदो उदो जयघोष
धूपारती ओवाळून
चरणात माथा टेकू
येई संकटी धावून. ९
शक्ती नारीस देऊन
वरदान न्यायासाठी
अत्याचार वाढू नये
अखंडित राही पाठी १०
विद्या प्रधान
ठाणे
navratri marathi text png
काव्यबंध समुह आयोजित (काव्यलतिका)
काव्य स्पर्धा विषय- नवरात्री
नवरात्रीच्या नवदूर्गा | navratri marathi text png

नवरात्रीत या करूया जागर देवी अंबेचा।
पाहूनी तीचे रूप मनोहर खुंटली वाचा।।
शैलपुत्री ती हिमालय सुता देवी महामाया।
पूजन करू प्रथम दिनी कर दीनांवर दया।।
द्वितीय दिनी प्रेममयी माता ब्रम्हचारिणी ।
कमंडलू शोभे हाती शुभ्र वस्त्रधारिणी।।
तृतीय दिनी करु वंदन देवी चंद्रघंटेला ।
सुवर्ण कांती अतिसुंदर देवी महाबला ।।
चतुर्थ दिनी करु पूजन कूष्माण्डा मातेला।
अष्टभुजा देवी शोभे सुंदर कुमारी बाला।।
पंचम दिनी करु नमन स्कंद मातेचे ।
स्वार झाली सिंहावरी करिते पुजन तिचे।।
सहावे दिनी स्मरु कात्यायनी सुंदरी।
चतुर्भुज मुर्ती शोभे सुंदर साजिरी।।
कृष्ण वर्ण कालरात्री पूजावी सातवे दिनी।
तम दाटले जगती ते दूर करीशी झणी।।
महागौरी ती गौर वर्णा पुजा अष्टम दिनी।
अर्धांगिनी ती शिवशंभूंची शोभे जगतजननी।।
नवम दिनी स्मरु माता सिद्धिदात्री।
यश ,बल, किर्ती, धन देई माता जगधात्री।।
– सौ. स्वरूपा कुलकर्णी
राहाता, अहमदनगर

navratri marathi text png
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह