navratri marathi whatsapp status

महिषासुरमर्दिनी आणि आराधना | 2 Best navratri marathi whatsapp status

रवी आटे आणि सौ. भारती गाडगिलवार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi whatsapp status विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

navratri marathi whatsapp status

काव्यबंध समूह
काव्य लतिका
रविवारीय स्पर्धा
विषय-नवरात्री
दिनांक 8 ऑक्टोबर 2023

महिषासुरमर्दिनी | navratri marathi whatsapp status

महिषासुरमर्दिनी आई आराधना | 2 Best navratri marathi whatsapp status

झाले झाले शारदीय नवरात्रीचे आगमन
करूया आता महिषासुरमर्दिनीला नमन

घेऊया दर्शन देवीच्या नऊ दिवसांच्या नऊ रूपांचे
धूपाने पावित्र्यपूर्ण करू स्वरूप आसमंताचे

करू कुमारिका पार्वती
सरस्वती आणि काली पूजन
त्याज्य परंपरा मोडीत काढू
नव्या युगाचे करूया सृजन

देवीचे नामस्मरण उपासना जप असतो शुभ लाभदायक
नऊ दिवसात करते नष्ट असुऱ्या शक्ती भितीदायक

पावसाळ्यात पेरलेले प्रथम पीक घरात येते
दुर्गेच्या आगमनाला आनंदाने समर्पित होते

ब्रह्मदेवाने महिषासुराला दिले होते अमरत्वाचे वरदान
राक्षसी कृत्यात गुंतला होता नव्हते त्याला माणुसकीचे भान

ब्रह्मा विष्णू महेश यांनी घातले देवीला साकडे
मग देवीने नऊ दिवसात केले त्याचे तुकडे तुकडे

नऊ प्रकारचे नवे धान्य अर्पिती मातीच्या टोपलीत
सुती रेशमी साडी खण तांदूळ नारळ देवीच्या ओटीत

आरती झाल्यावर अष्टमीला होम हवन करतात
उदाच्या धुपाने पाच वेळा घागर फुंकतात

शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा देवी पहिल्या चार
स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी नंतरच्या चार

नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची करूया भक्ती
फळफुलं वाहू तिला करू भजन आरती

दहावा दिवस येता शेवटी विजयादशमीचा
पाऊस पडतो सर्वांच्या जीवनात
नवचैतन्याचा

रवी आटे…सानपाडा
9324745970
——-

navratri marathi whatsapp status

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
विषय : नवरात्री
दि : ८/१०/२३

आराधना | navratri marathi whatsapp status

आराधना | 2 Best navratri marathi whatsapp status

उत्सव नवरात्रीचा
जागर स्त्री शक्तीचा
अंतरंगात घुमतो
सेवाभाव भक्तीचा ….!१!

अवतरते नव्या रूपात
प्रत्येकीचा रंग वेगळा
अवतार कहाणी वेगळी
सेवेचा थाटही आगळा….!२!

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी,
चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता,
कात्यायनी, कालरात्री, महागौरी,
सिद्धीदात्री जगी सर्वांची तू माता….!३!

आई भवानी कृपा असु दे
होऊनी नतमस्तक तव चरणी
भाव भक्तीने तुला हाक देती
सर्वांच्या मनी तुझी गोड गाणी…!४!

आदीशक्ती, मोक्षदात्री,
रूद्रारूपी, महादेवी जगदंबे
अष्टभुजा धारिणी, विश्व संचारिणी
आई भवानी जय जय अंबे…!५!

विविध रूपांची स्वामिनी
नाथांची सावली तू
अनाथांची माऊली तू
हाकेला धावती तू…!६!

चैत्र नि आश्विन मासात
आराधना करती भक्त जन
षोडशोपचारे पूजा करून
उत्साहात साजरा करती सण…!७!

प्रत्येक मुखात तुझेच नाव
भक्तांची तू तारणहार
मनोमनी तुझा ध्यास
साऱ्यांच्या भक्तीचा कर स्विकार….!८!

सौ. भारती गाडगिलवार, चंद्रपूर

navratri marathi whatsapp status

 Best navratri marathi whatsapp status

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *