Navratri special kavita in marathi

अंबाबाईचे रूप बघण्या आणि नऊ रंग नवरात्रीचे | 2 Best Navratri special kavita in marathi

सौ. चंद्रकला प्रमोद अमृतकर आणि गोंविद शिवराम कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Navratri special kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Navratri special kavita in marathi

काव्यबंध समूह आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार.
दिनांक:- 8 10 2023
काव्य लतिका:- स्पर्धा
विषय :-नवरात्री

अंबाबाईचे रूप बघण्या | Navratri special kavita in marathi

अंबाबाई रूप तुझे किती सुकुमार
अंबाबाई किती सुकुमार
बघण्यासाठी आम्ही आलो
भरला हा दरबार अंबे भरला हा दरबार || धृ||
नाकी मुक्ताफळ, कानी कुंडलें
कपाळी चंद्रकोर अंबे कपाळी चंद्रकोर
कंचुकी सुंदर शालू ल्याली
इंद्रधनु बुट्टेदार आंबे सप्तरंगी बुट्टेदार ||१||

अंबाबाई पायी ,पैंजण भांगी शेंदूर
कंठी रत्न हार अंबे कंठी रत्नहार
मस्तकी मुकुट, वाक्या तोडे
चुडा हिरवा गार अंबे चुडा हिरवा गार ||२||

विश्व तारण्यासाठी अंबे
हाती तुझ्या तलवार अंबे हाती तुझ्या तलवार
दानव संहारिनी अंबे
जगताला आधार अंबे जगताला आधार ||३||

आदिशक्ती आदिमाता नवदुर्गा
रूप घेशी साकार अंबे रूप घेशी साकार
नवरात्री या आळविती तुला
भक्तांना तू तार अंबे भक्तांना तू तार ||४||

नवरात्री मध्ये नवअवतार घेशी
सुप्रभाती बालरूप घेशी अंबे बाल रूप घेशी
मध्यान्ह वेळी तारुण्यात
साकारशी आंबे तारुण्यात साकारशी
सायंकाळी वृद्ध अवतार घेशी अंबे वृद्ध अवतार घेशी
असा हा तुझा अघात महिमा भक्तांना पावसी अंबे भक्तांना पावसी ||५||

नवरात्री दुर्गेचा गजर
“हसते ये अंबे नाचत ये
फुलांचा झेला झेलीत ये”

अंबाबाईचे रूप बघण्या आणि नऊ रंग नवरात्रीचे | 2 Best Navratri special kavita in marathi

सौ चंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे
88 88 66 65 76

Navratri special kavita in marathi

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
काव्य बंध समुह आयोजित
साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक. ८/१०/२०२३
विषय : नवरात्री
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

नऊ रंग नवरात्रीचे | Navratri special kavita in marathi
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

शारदीय नवरात्रीचे
नऊ रंग ,नऊच दिन,
नवरात्रीची नऊ रूपे
नववधूचा असे मान……१

केशरी वस्त्र पांघरूनी
दुर्गा माता अवतरली.
दुर्गा मातेच्या पूजनाने
अथेति ऊर्जा उपाधली….२

पांढरा रंग शुद्धतेचा
साधेपणाच दर्शवतो.
देवीच्या आशीर्वाचनाने
शांत मुद्रा अवलंबतो….३

उत्साह प्रेमाचे प्रतीक
दुर्गा मातेला लाल वस्त्र,
भक्ती शक्ती फुलवतात
हातामध्ये असते अस्त्र…४

गडद निळा रंग देतो
अतुलनीय अनुभूती.
सुख समृद्धी शांततेची
विलोभनीय प्रतिकृती…५

पिवळा रंग आशावादी
दुर्गा मातेला दिसे भारी ..
आईचे संस्कार ,वास्तल्य
प्रेम रूपे दिसते न्यारी….६

हिरवा रंग नैसर्गिक
स्थिरता वाटे अचानक .
मांगल्याचे दिसे प्रतीक
मातेच्या रूपात अथक…७

राखाडी रंग संतुलित
साधे होण्यासाठी प्रेरीत .
फुलोरा असे सप्तमीस
दुर्गा मातेच्या आनंदात…८

जांभळा रंग राजेशाही
कुमारिकांच्या आठवणी ..
हळदी कुंकू अष्टमीस
सुख , समृद्धी, अक्षवाणी…९

निळ्या हिरव्याचे मिश्रण
मोरपंखी देतो आदर.
दुर्गा मातेचा आशीर्वाद
मीळे जीवनाला आधार…१०

(C)(R)
गोविंद शिवराम कुलकर्णी
नौपाडा ठाणे
९८२०५ ८४४७९

Navratri special kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *