what is new education policy 2020

New education policy 2020 | राष्ट्रीय शैक्षणिक धोरण Best for Students

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे भारतीय शिक्षणाच्या नवयुगाची सुरुवात.. New education policy 2020: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांमध्ये “शिक्षणाचे जागतिकीकरण” या शब्दाला महत्त्व देण्यात आलेले आहे. जगातील विविध प्रगत देशांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी नवनवीन अध्यापन पद्धतींचा वापर करण्यात येत आहे. आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशाच नवनवीन अध्यापन पद्धतींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. Crossover Learning, Learning through Argumentation, Incidental Learning, Context based Learning, Computational Thinking, Learning by doing, Embodied Learning, Adaptive Teaching या नवनवीन अध्ययन अध्यापन पद्धतींचा वापर शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जाणार आहे. शिक्षण हे अांतरक्रियेतून घडते.

ही आंतरक्रिया जेवढ्या उत्तम प्रकारे होईल, तेवढीच शिक्षणाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने घडून येईल. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षक शिक्षणाबद्दल मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले असून ज्यातून भावी पिढीसाठी आवश्यक असणारा उत्तम शिक्षक कसा घडवता येईल, त्यादृष्टीने शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये आमूलाग्र बदल सुचविण्यात आलेले आहेत व पुढील पाच ते दहा वर्षाच्या काळामध्ये त्या बदलांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा मानस केंद्र सरकारने व केंद्रीय शिक्षण मंञालयाने ठेवला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वीचे मानव संसाधन विकास मंत्रालय हे आता केंद्रीय शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखले जाईल.

New education policy 2020: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020/ what is new education policy 2020

New education policy 2020: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण प्रक्रिया लवचिक करण्याकडे अधिक भर देण्यात आलेला आहे. तसेच मातृभाषेतून शिक्षण या बाबीवर अधिक भर देण्यात आलेला आहे. सदर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून 34 वर्षानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल घडून येण्यास सुरुवात झालेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे यामध्ये एकाच वेळी विद्यार्थ्याला वेगवेगळे विषय शिकता येणार आहेत. यामुळे आर्थिक अथवा अन्य बाबींमुळे विद्यार्थ्यांची शिक्षणातून होणारी गळती कमी होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय शिकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार दहावी आणि बारावी या बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी करण्यात येणार असून कोठारी आयोगाने घालून दिलेला 10+2+3 या आकृतीबंधामध्ये बदल करून ती रचना आता 5+3+3+4 अशी करण्यात येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालकाच्या शिक्षणाला आता वयाच्या तीन वर्षांपासूनच सुरुवात होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार होणारा आणखी एक नवीन बदल म्हणजे शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील बालके मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कार्यकक्षेत येत होती, तर आता ती मर्यादा 3 ते 18 वर्षापर्यंत वाढवण्यात येईल.

New education policy 2020: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020/ what is new education policy 2020

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धोरणात अवघड व वाईट वाटून घेण्यासारखे काहीच नाही. परंतु सदर धोरणाची उत्तम अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना मात्र स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करून घ्यावे लागतील व नवीन शैक्षणिक धोरणानुसार अधिक कार्यतत्पर व्हावे लागेल आणि अधिक मेहनत घेण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्याला जर भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे इसवी सन 2020 सालापर्यंत भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न 100% पूर्णत्वास न्यायचे असेल, तर आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील बदलांचा स्वीकार सकारात्मक रित्या करावा लागेल.

आपल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये तात्विक ज्ञानावर जास्त भर दिला जातो. परंतु एखाद्या क्षेत्रात कार्य करत असताना आपण मिळवलेले तात्विक ज्ञान व प्रत्यक्ष कार्य करताना येणारी आव्हाने यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून येते. याच बाबींचा सखोल विचार करून व सध्याच्या काळाची व भविष्याची गरज लक्षात घेऊन कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून “आत्मनिर्भर भारत” हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने व्यवसायिक शिक्षणावर जास्त भर देण्यात आलेला आहे.

या व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित व कौशल्याधिष्ठित, कुशल मनुष्यबळ आपणास मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल व ज्याचा फायदा भारत देशाला विश्व पटलावर एक प्रगत व आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी उपयुक्त ठरेल.

वाचा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशा तयार कराव्या?

१५ ऑगस्ट भाषण वाचा

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

New education policy 2020

डाॅ. वसुदेव व्ही. राऊत
प्राचार्य,
विलास तांबे शिक्षणशास्ञ महाविद्यालय, जून्नर, पूणे

New education policy 2020

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *