हल्लीचं प्रेम | Best Online love marathi poem sad in 2024

अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Online love marathi poem sad in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Online love marathi poem sad in 2024

काव्यबंध समूह आयोजित
काव्यतालिका रविवारीय काव्यास्पर्धा
दि.१० मार्च २०२४
विषय. : ऑनलाईन प्रेम

हल्लीचं प्रेम | Online love marathi poem sad in 2024

हल्ली प्रेम झाले आहे
सहज आणि स्वस्त
प्रसार माध्यमे मध्यस्थ
जमवी जोड्या मस्त. १

प्रेम करताना ऑनलाईन
पाहिला जात नाही स्वभाव
काळे गोरे कोणी चाले
संपून गेले भेदभाव.. २

मेकअप मधले फोटो पाहून
होऊन जाते सहज प्रेम
माध्यम कोणीही असो
सगळ्यांचे असते सेम.. ३

ऑनलाईन प्रेमाचा असतो
अजून एक फायदा
जातीभेद पाहत नाही
या प्रेमाचा कायदा… ४

इडिट केलेले फोटो पण
किती मनाला भावते
जरी केस काळे केले
पसंतीची मिळते पावती,. ५

लाईक, शेअर फोटोला
करून प्रेम होई
जरा जरी केले दुर्लक्ष
ती चढून बसते डोई.. ६

लाईक, शेअर मधून दिसे
यांचे प्रेम अतोनात
व्हिडिओ काॅल करताना
मंजुळ आवाज कानात.. ७

माहीत नसते कोणाचे
किती असती प्रेम वीर
रांझा म्हणते प्रत्येकाला
ती जणू प्रत्येकाची हिर.. ८

रंगरुप तर दिसते पण
गुण मात्र कळत नाहीत
क्राॅसलाईन झाल्यावर पडते
सगळे पितळ माहीत. ९

रोज प्रेम होते आणि
होतो रोज काडीमोड
या असल्या प्रेमात पोरं
रोज बदलती जोड… 10

खरे प्रेम या जगी
कोणीही करत नाही
असेल कोणी असा तो
जीवनभर कुंवारा राही.. ११

ऑनलाइन प्रेमात एक
होत असतो फायदा
जरी कोणी सोडून गेली
मरण्याचा नाही कायदा.. १२

ऑनलाईन प्रेमातून
जलद होतात लग्नंं
तेवढेच जलद घटस्फोट
होतात आयुष्य भग्न.. १३

अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद पंढरपूर
7038313235

Online love marathi poem sad in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *