Pahile Prem Kavita

प्रवास प्रेमाचा | माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कविता बाळू आढागळे यांची -“प्रवास प्रेमाचा”- हि कविता -माझे पहिले प्रेम- या विषयावर असून हि एक Pahile Prem Kavita आहे

प्रवास प्रेमाचा | Pahile Prem Kavita

प्रवास प्रेमाचा | माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Kavita 2023

_*वाटलंच नव्हतं मला कधी एक संधी मिळेल,*_
_*आणि तुझं -माझं पहिलं प्रेम या जगाला कळेल,*_
_*माझ्या या लेखणीतून तुला, पुन्हा आठवायला मिळेल,*_
_*आणि या अबोल भावनेतून तुला शब्दात गुंफायला मिळेल,*_
_*तुझं असणं आणि नसणं सांगायलाही थोडा काळ मिळेल,*_
_*आणि तुझं – माझं पहिलं प्रेम या जगाला कळेल….*_



_*आयुष्याच्या उंबरठ्यावर अगणिक अशी भेटली,*_
_*काहीशा त्या सहवासातच आपलंसं करून गेली,*_
_*तुझ्या त्या ओठावरचा हसू आणि गालावरची खळी,*_
_*अजूनही आठवण करून देते ते प्रेमाचे सोहळे वेळोवेळी…*_



_*तुझ्या निरागस अबोल भावनांनी कधी मला मोहणी घातली कळालंच नाही,*_
_*तुला पाहणं मागे फिरणे हे कामच होऊन बसलं,*_
_*बावरलेलं मन माझं तुझ्या प्रेमात जडल्याशिवाय राहिलंच नाही,*_
_*तुझ्या त्या पैंजणाची चाहूल लागतच,*_
_*दंग व्हायचो जसं भजनात,*_
_*आयुष्यात रंग भरताना प्रेमाचे रंगारी व्हायचो तुझ्या जीवनात,*_
_*तुझं ते हसणं आणि माझ फसणं एकाचवेळी आलं होत गलबलून,*_
_*गेला होता तोल माझा जरी घेतला मी सावरून…*_



_*तुझा हवा – हवा तो सहवास त्यांनीच तर पाडल तुझ्या प्रेमात,*_
_*माझं पहिलं प्रेम नव्हतं तर तुझ्या जगण्याची आण होती माझी मला,*_
_*तुझ्या प्रेमात हसण्याची हीच तर खरी शान होती मला,*_
_*तू जवळ नसलं की जीवनाची घाबरगुंडी उडायची,*_
_*हीच तर स्वप्न होती तुझ्या प्रेमात पडायची….*_



_*तुझ्या सहवासातच जगण्याचं वेड होतं,*_
_*नुसतं वेडच नव्हतं तर तुझ्या माझ्या जीवनाचा कोड होतं,*_
_*माझं पहिलं प्रेम नव्हतं तर भावनांचा खेळ होतास,*_
_*दुसरं तिसरं काय नसून तुझ्या माझ्या विचारांचा खरा मेळ होतास…*_



_*माझं पहिलं प्रेम नव्हतं तर तुझ्यावर हक्काने रुसणं होतं,*_
_*हसता हसता डोळ्यातलं पाणी अलगद पुसणं होतं,*_
_*तुझ्यासाठी चंद्राप्रमाणे लाजणं होतं,*_
_*दाटलेल्या आभाळालाही कवेत घेणं होतं,*_
_*तुझ्यासोबतच जग खरच निराळच होतं…*_



_*तू दिलेल्या मोरपिसाला अजूनही जीव लावत होतो,*_
_*तू गेल्यावर न खंत ना खेद वाटत होता,*_
_*एवढं काळीज मी मात्र घट्ट केलं होतं,*_
_*तुझ्या प्रेमाची सप्तपदी मी अशी जपून ठेवीन,*_
_*तू पुन्हा येणार आहे या आशेने जगत राहीन…*_



_*तुझ्या माझ्या आठवणीची सागर मात्र आटवून देणार नाही,*_
_*तुझं माझं पहिलं प्रेम हे मात्र जगाला दाखवून देईन,*_
_*एवढं प्रेम करूनही माझं मन रडत आहे,*_
_*उरलो होतो स्मशानात एकटाच,*_
_*मला सोडून सखे तू दूर जात आहेस हे खरे,*_
_*आणि जाताना सखे एवढेच म्हणेन नांद तू सौख्यभरे…*_

Pahile Prem Kavita 2023

प्रवास प्रेमाचा | Pahile Prem Kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

प्रवास प्रेमाचा | Pahile Prem Kavita

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
8 + 11 =