Pahile Prem Marathi Kavita

माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Marathi Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी रवींद्र आटे यांची -💐 माझे पहिले प्रेम 💐- हि एक Pahile Prem Marathi Kavita आहे. तुम्ही त्यांना 9324745970 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

माझे पहिले प्रेम | Pahile Prem Marathi Kavita

माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Marathi Kavita 2023

खरे सांगायचे मित्रा तर
मला हजारदा प्रेम झाले!
पण प्रत्येक वेळी
ते पहिलेच होते!!!

हो… म्हटले होते मी…
तिच्यावर लाख कविता करेल
म्हणून काय मी शेकडो शब्दात
तिच्यावर कविता लिहावी?
त्यापेक्षा तिच्यावर मी
कथा कादंबऱ्या
लिहिल्या नसत्या काय?
आणि लिहिणारही काय
तिची माझी भेट झाली
तेव्हा तर पावसाळा देखील
संपलेला होता
तिच्या माझ्या पहिल्या भेटीत
असे शब्द प्रयोग देखील
कवितेत कसे करू?

भेट मुळात कधीच झाली नाही!
नजरानजर झाली बऱ्याचदा
तो ही माझा भ्रमच असावा
तूच तर म्हणतो
चांदणे नभाचे कधीही थरथरत नसते
ते तर केवळ नजरेची नजर बंदी असते
मग काय ते समजून घे ना!
खरेच तिची माझी भेट झाली असती तर कविता लिहिली असती काय
तिच्या भेटीत मी मला ज्ञात असलेल्या सर्व भाषा
अन् सर्व शब्द
तिथेच विसरलो नसतो काय?

तिच्या आठवणीने देखील
अंगाला हिवाळ्यात व
पावसाळ्यात देखील
दरदरून घाम सुटतो
त्या पावसाळ्यानंतर
अनेक पावसाळे गेले आहेत तरी
तिचे जीवनात येणे
हा कल्पनेचाच भाग असला तरी
जगणे किती मनोहारी झाले होते!
जगण्याला प्रकाशाचे
मधुर ध्वनींचे
व पारिजातकाच्या सुगंधाचे
लेणे लाभले होते
हातात हात देईल
असे तेव्हाही वाटले नव्हते
व आताही…अशीच डोळ्यासमोर उभी राहावी असे वाटत होते
तेव्हाही व आताही
पण ती उभी राहून राहून थकणार नाही का रे
कंटाळणार नाही काय?

मुळातच ती माझी इच्छापूर्ती कशाला करेल
कधी बोललीच नाही तर वचन देण्याचा प्रश्नच कुठे आला?
हे आपले असेच
हजारदा प्रेम होत गेले
प्रत्येक वेळी पहिलेच आहे असे वाटत राहिले
असे उगाच वाटत राहते कि ती खरोखरच भेटली असती
तर हे जगणे किती
स्वर्णिम झाले असते
पण हाही एक भ्रम!
भेटली नाही ते बरेच झाले
आजूबाजूच्या प्रेम कहाण्या बघितल्यावर
तिचे न भेटणे
ईश्वराचे वरदान वाटते

मला असे क्षण नकोत
जे वारंवार गोळा करावे लागतात
एक तर या क्षणांचा परिणाम कायमस्वरूपी टिकत नाही
मुळातच यांचा परिणाम
वरवरचा असतो!
संपूर्ण जीव न ओतल्याने
प्राप्त झालेला क्षण
तृप्ती ती काय करणार?

कवितेत अर्धविराम पूर्णविराम काना मात्रा वेलांटी उद्गारवाचक चिन्ह वा प्रश्नार्थक चिन्ह
काहीही येत असेल
तर ती कविताच कसली
शब्दांची तरी मोहोताज ती का असावी?
असेच जाणून घ्या ना
तसेच समजुन घ्या ना
कशाला हवी मानवी भाषा
आणि लिपी
त्या जगात भेट होईल
तेव्हा कोणती भाषा असणार
सराव नको का करायला?

तिला नेहमीच म्हणतो
क्षितीजापलीकडे बघ
नंतर माझ्याकडे बघ
शेजारीच बसलो आहे
माझ्या नसानसांतून व तिच्या देखील नसानसांतून
प्रीतीचे झरे वाहत आहेत
पण तिलाही माहित नाही
मला देखील
मात्र तरीही
मला तर सततच वाटते
तिलाही कधीतरी वाटेल
तिच माझे पहिले प्रेम आहे
मी तिचे कधीही
प्रेम नसलो तरी!!!

माझे पहिले प्रेम | Pahile Prem Marathi Kavita

माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Marathi Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Marathi Kavita 2023

3 thoughts on “माझे पहिले प्रेम | Best Pahile Prem Marathi Kavita 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
27 × 9 =