बाप | best poem father to son class 11 in 2023

बाप | best poem father to son class 11

ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem father to son class 11 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

poem father to son class 11

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका

विषय :- वडील/ बाबा/ पप्पा /बाप

बाप | poem father to son class 11

poem father to son class 11

वरून वाटतो कठोर आतून
मधुर पाण्याचा झरा आहे.
मुलांना सरळ करण्याची त्याची
एक वेगळी तर्हा आहे
खटकत असेल मनात तुमच्या
पण तुमचा बापच खरा आहे ॥१॥


मुलांनी वळणात राहावं म्हणून
सतत सतत रागतं असतो
दिल्या पैशांचा हिशोब त्यांना
जव्हाच्या तव्हाच मागत असतो
लाडाने मुलं बिघडून जातात
असाच त्याचा होरा आहे ॥२॥


प्रत्येकाच्या गरजेपायी
एकटा बापच वाहत असतो
घरातल्यांच्या सुखात नेहमी
आपलं सुख पाहत असतो
दुःखाला दाबून हसत राहण्याचा
त्याचा फंडाच न्यारा आहे ॥३॥


आपल्यासाठी बाप म्हणजे
आम्रतरुचं झाड असतं
त्याने दिलेलं प्रत्येक फळ हे
आपल्यासाठी गोड असतं
बाप म्हणजे आपल्यासाठी
उन्हातला गार वारा आहे ॥४॥


बापाचा आपल्या मुलामुलीत
जीव जिवा जिवापाड असतो
जोवर बाप असेल तोवर
आपला सारा लाड असतो
शेवटपर्यंत त्याच्यावरच
आपला भार सारा आहे ॥५॥

ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे. (आप्पा)
भालगांव .छ.संभाजीनगर.

poem father to son class 11

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *