poem father to son word meaning

तो बाप असतो | best poem father to son word meaning in 2023

कु. कविता बाळासाहेब आढागळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem father to son word meaning विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

poem father to son word meaning

काव्यबंध शब्दसमुह
काव्यलतिका कविता स्पर्धा

तो बाप असतो | poem father to son word meaning

बाप नावाच पुस्तक,पान पलटून हि समजेल पण,बाप समजायला त्याच्या व्यथा जो वाचतो तो बाप असतो

तुझा जन्म होतो तेव्हा, जो जगाला पेढे वाटतो
तुम्हचा गोजिरवाणी चेहरा पाहून, उर ज्यांचा दाटतो
चिऊ-काऊ चे घास भरवत, जो बोबडे बोल शिकवतो तो बाप असतो

कधीही न झुकलेला, तुझ्यासाठी घोडा होऊन झुकतो
शाळेसाठी तुझ्या रोज अनवाणी पाय झिजवतो
साहेब बनवया तुला रोज माती लोकांची राधंतो तो बाप असतो.

तुझ्यासोबत लढाई करताना, जिंकण्यासाठी तुला कित्येकदा माघार घेतो तो बाप असतो.

मैदानावर उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर हात ठेवतो तो बाप असतो

सुखाने भरलेली ओजंळ जो पिल्लांसाठी रिती करतो तो बाप असतो.

हृदयाला झालेल्या जखमा लपवत जो हसत असतो तो बाप असतो.

डोळ्यातले अश्रू पापण्यांची कडांवर थोपवत असतो तो बाप असतो.

लग्नमाडंव जरी भरला पाहुण्यांनी पोरीच्या नजरेला हुलकावणी देत मांडवाच्या कोपऱ्यात रडतो तो बाप असतो.

लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जो शिळ्या भाकरीलाही जागतो तो बाप असतो.

स्वप्न स्वतः ची वेशीला टांगून थकलेले देह घेऊन जो रोजच जळतो तो बाप असतो

आयुष्यातल्या खाच-खळग्याना जो माफ असतो तो बाप असतो

आयुष्य वेचताना स्वाभिमानाचे धडे गिरवत असतो तो बाप असतो

स्वतः फाटक्या सदऱ्यात आणि तुटक्या चपलीतच संसार साधंतो तो बाप असतो

कवयित्री:-कु कविता बाळासाहेब आढागळे ता: नेवासा जि:अहमदनगर

poem father to son word meaning

तो बाप असतो | best poem father to son word meaning in 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह