Poem for Granddaughter in Marathi

छोटीशी मैत्रीण by सौ. जयश्री सं. धोका | Best Poem for Granddaughter in Marathi 2024

सौ. जयश्री सं. धोका यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Poem for Granddaughter in Marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

छोटीशी मैत्रीण | Poem for Granddaughter in Marathi

काव्यबंध समूह आयोजित उपक्रमासाठी
आजी व नात या विषयावरील कविता
माझी छोटी नात आर्या, माझी मैत्रीण!! तिच्या सोबत मी मोठेपण विसरून लहान होते. थोडे तिचे थोडे माझे असे आमचे मेतकूट जमते. साऱ्या जगाचा विसर पाडणारे, तिचे माझ्याभोवती वावरणे, मला स्वर्गसुख देते.

छोटीशी मैत्रीण | Poem for Granddaughter in Marathi

छोटीशी मैत्रीण by सौ. जयश्री सं. धोका | Poem for Granddaughter in Marathi 2024

छोटीशी मैत्रीणं माझी, ती नातं मी तिची आजी ॥धृ॥
जेंव्हा केंव्हा प्रश्न तिला पडे,
त्यांचे उत्तर असते माझ्याकडे
आणि तिच्या बरोबरssss
माझा इंग्लिशचा अभ्यास घडे
तिच्यापुढे मला करावे, लागते हाजी हाजी,
छोटीशी मैत्रीण माझी, ती नातं मी तिची आजी ॥१॥

कधी होते ती दुकानदारं,
आणि मी गिराईकं बेजारं
दहा रुपयांचे बिल शंभरं,
तर कधी मिळते उधारं
एका पप्पी वर सुद्धा मिळते, ताजी ताजी फ्रुटं, अन् भाजी,
छोटीशी मैत्रीण माझी, ती नातं मी तिची आजी ॥२॥

कधी ती माझी आईच होते,
मला हळूचं कुशीत घेते
मी थोडीशी चुळबूळ करता,
ती थोपटूनं झोपवितेऽऽऽ
स्वप्नांच्या जगास पुरते, ईवल्याशा हातांची उशी,
छोटीशी मैत्रीण माझी, ती नातं मी तिची आजी॥३॥

आमच्या दोघींच्या मैत्रीमध्ये,
नाही कोणीच छोटे मोठे
मी मस्तीत दंगा करते,
तेव्हा ती छडी हातात घेते
तिने केलेल्या शिक्षेला, मी क्षणात होते राजी,
छोटीशी मैत्रीण माझी, ती नात मी तिची आजी॥४॥

सौ. जयश्री सं. धोका. पुणे.

जयश्री सं. धोका | Poem for Granddaughter in Marathi 2024

छोटीशी मैत्रीण | Poem for Granddaughter in Marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

छोटीशी मैत्रीण | Poem for Granddaughter in Marathi