मैत्री | Best poem in marathi on aaji 2023

मैत्री | Best poem in marathi on aaji 2023

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem in marathi on aaji विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

poem in marathi on aaji

काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा.
विषय..आजीची छकुली.
दि.१४/९/२०२३

मैत्री | Best poem in marathi on aaji

मैत्री | poem in marathi on aaji

जन्मा आली ती अन्
आनंद सर्वांना झाला
जन्मा बरोबरच तीने
माझा नामकरण सोहळा केला

सुंदर डोळ्यांची बाहुली
चिमुकली जशी परी
लक्ष्मीच रुप घेऊन
आली आमच्या घरी

कुणी म्हटले सोनुली
गोंडस गोरी चिमुकली
तिची माझी गट्टी छान
ही तर छोटी छकुली

जन्मान तीच्या मात्र
ओळख प्रत्येकाला मिळाली
आई,बाबा,मावशी ,मामा
आजीची पदवी मज मिळाली

नात माझी लाडाची
जशी साय दुधावरची
सहवास तीचा सुखाचा
पर्वणी जणू आनंदाची

बोबड्या तिच्या बोलांनी
घर सार बोलत राहत
दुडू, दुडू चालण्यान
घुंगरू पायी गाणं गात

जुन्या नव्या नात्याची
अशी ही सुंदर सांगड
छकुली माझी लाडाची
आजीचा असे आधारवड

जगावेगळ नात अस हे
असत सर्वच घरोघरी
आजीआजोबा,नात,नातूची
मैत्री असते सगळ्यात भारी.

सौ.संघमित्रा सोरटे.
माळशिरस.सोलापूर.

poem in marathi on aaji

poem in marathi on aaji

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *