कु. कोमल वसंतराव साखळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on aaji in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
काव्यबंध समुह आयोजित स्पर्धा
विषय: आजीची छकुली
दि: १४/९/२०२३
माझी लाडकी आजी | Poem on Aaji in marathi

आजी म्हणजे घराचा उंबरठा
नातवांचा आधार , मायाळू मूर्त ,अशीच होती माझी लाडकी आजी ,जीचा जीव गुंतला होता माझ्या मधी .
कधी रागवलं तर कधी प्रेमाने हात ही फिरवला तिच्या रागवण्यातही प्रेम झळकायच .कधी नजरे आड गेली तर छकुली छकुली करत गाव भर फिरायची .
जखमा मला मिठी मारायच्या मात्र अश्रु तिच्या डोळ्यातून ओझळायचे.जणू तिच्या
प्रेमळ स्पर्शाने माझ्या जखमा भरून निघायच्या .
तिच्या कुशीत निजायला मला फार आवडायचं जणू आईचीच दुसरी प्रेमळ मुर्त म्हणजे माझी लाडकी आजीचं होती. आजही आठवते तिची कुशी.
लहान पणी रात्रीला चांदण्याच्या प्रकशात अंगणात निजताना तिने सांगितलेले रामायण, महाभारत, भगवतगीता आजही स्मरणात
आहे .
शेवाच्या पदरात लपून ठेवलेला खाऊ आजही आठवतो. तिने भरवलेला प्रत्येक घास आज जणू आठवणचं बनून राहीली .
शाळेतून परत आल्यावर तिने भरून ठेवलेला दुधाचा प्याला आजही माझी नजर शोधते ,
मात्र तो आज दिसे नासा झाला.
संस्काराचा प्याला तिनेच पाजला, आयुष्य जगण्याचा मंत्र तिने दिला.
आजही आजी चा असण्याचा भास होतो . छकुली छकुली आवाज कानात गुंजतो.
कु कोमल वसंतराव साखळे
तळेगाव (शा. पं.) ता. आष्टी,जि .वर्धा.
माझी लाडकी आजी | Poem on Aaji in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
माझी लाडकी आजी | Poem on Aaji in marathi
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या शुभकार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला लेखन जमत नसले तरी काही हरकत नाही, तुम्ही चांगले मराठी साहित्य शेअर करून या कार्याला हातभार लावू शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह