अरविंद कुळकर्णी आणि श्री. संचित कांबळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on diwali in Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
poem on diwali in Marathi
स्पर्धेसाठी
काव्यबंध समुह आयोजित काव्यलतिका स्पर्धा दि.२९/१०/२१
विषय – सण दिव्यांचा
संस्कृती | poem on diwali in Marathi

सण दिव्यांचा दिवाळी
वाट पाहतेय खरी
घरी येणार पाहुणे
संगे आनंदाच्या सरी…(१)
सजावट व स्वच्छता
होत आली ही तयारी
परस्पर सहकार्य
देते मनाला उभारी…(२)
झाली खरेदी जोरात
खुश झाले चिमुकले
दिवे, पणत्या सोबत
थोडे फटाके घेतले…(३)
गाय वासराच्या अंगी
उदारता, मोद,शांती
वसुबारसेला जुनी
त्यांच्या पूजेची संस्कृती…(४)
दिपावली हा मुहूर्त
पूजा श्री धन्वंतरीची
करू प्रार्थना देवाला
निरामय आरोग्याची…(५)
नरकचतुर्दशीला
नरकासुराचा वध
स्नान पहाटे अभ्यंग
घ्यावा संस्कृतीचा बोध…(६)
लक्ष्मीपूजनाचा दिन
राहो श्री लक्ष्मी प्रसन्न
सरस्वती,लक्ष्मी पूजा
नित्य राहो घरी अन्न…(७)
भाऊबीज व पाडवा
खरा नात्यांचा उत्सव
दिवे,फराळ,रांगोळ्या
रोषणाई महोत्सव…(८)
देवू सर्वांना शुभेच्छा
मिळे संतोष मनाला
पर्यावरणाची रक्षा
करू दिवाळी सणाला…(९)
अरविंद कुळकर्णी
मलकापूर
जि. – बुलडाणा
मो. -९८२२६४२२९४
short poem on diwali in marathi
काव्यबंध समूह आयोजित
साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा
दिनांक : २९/१०/२०२३
विषय : सण दिव्यांचा
संस्कृतीची दिवाळी | poem on diwali in Marathi

आला आला नित्याचा
आला सण दिव्यांचा
आला आला नव्याने
सण हा प्रकाशित होण्याचा
नवी नवेली पहाट येते
सडा-रांगोळ्यांनी आंगण सजते
उत्साहाचे तेज बहरते
तोरणे-पताक्यांनी द्वार लगडते
नव्या विचारांची नवी वस्त्रे
परिधानू सगळे आपुलकीने
कैक दिव्यांच्या सोबतीने
उजाळू नाती हर्ष-मोद भराने
नरक चतुर्दशीचे पवित्र वासर
करूनी निर्दालन नरकासुराचे
अपप्रवृत्तीच्या खोल खाईमध्ये
फेकू गाडू अस्तित्व खल विचारांचे
लक्ष्मीपूजनाने करूया वंदन
धनाच्या मातेचे रक्षण
फटाक्यांच्या आतिषबाजीने
करू चांगुलपणाचे संरक्षण
बळीचं राज्य परत आणू
बलिप्रतिपदेच्या दिवसाने
धन-धन्याची बरकत होईल
बळीराजाच्या अपार कष्टाने
बहिण-भावाच्या प्रेमाचा
दिवस भाऊबीजेचा
एकमेकांप्रतीच्या भाव-बंधाचा
रक्त नात्याच्या मांगल्याचा
आपुले सण, आपुली माती
सुसंस्काराचे गीत गाती
एकोप्याच्या श्वासांमधूनी
करू दिवाळी उजळून छाती
तेजोमय संस्कृतीचे पाईक आपण
वारी चालवू स्नेहबंधाची
वावटळीत दृष्टविचारांच्या
उभारू गुढी लक्ष दिपांची
श्री.संचित कांबळे
कोल्हापूर

poem on diwali in Marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह