के. पी. बिराजदार आणि श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on farmer in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
शेतकऱ्या नावानं | poem on farmer in marathi
काव्यबंध समुह
काव्यलतिका
दि.३१.०८.२३
विषय:-शेतकरी
शेतकर्या नावानं……!!!!!

किती वाट पाहु सजना तुझी मी
डोळ्यातले अश्रु बघ कसे आटले
मृग येईल न्हाऊ घालील वाटले मला
परी ढग नि आकाश पांढरेच दाटले
वणवा पेटलाय जाळ लागलाय ऊरी
आले नक्षत्र चालले देहभान फाटले
यायचे तर वेळेत का रे येत नाहीस तु
का तुच आत्महत्येचे दुकान थाटले?
गुरे-ढोरे-लेकर-बाळं जगावी रे कशी
तुझ्या क्रूर थट्टेने माझा देहाला छाटले
खाता-बियाची महागाई आणि टंचाईनं
उद्योगपती पोट भरभरून चाटले
खादीच्या ढगांनी तर कहर केला आता
शेतकऱ्यांच्या नावानं पाच वर्ष गाठले
निसर्ग मारतो वरून,सरकार खालून
बैलासारखं जगुन अश्रु सारे बाटले
जन्मच मुळात शापित आयुष्यभर
डोळे आणि हात आभाळाला गाठले
.के.पी.बिराजदार
तुरोरी.
बळीराजा | poem on farmer in marathi
काव्य बंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
विषय: शेतकरी
शिर्षक : बळीराजा
दिनांक: ३१\८\२०२३

कांद्याला काडी लावली
टमाटे वावरात सडली,
सोयाबीन मध्ये गुरे सोडली
एवढी सारी बरबादी सरकारी धोरणामुळे झाली .॥१॥
मार्केट यार्डात लिलाव ऐकून
शेपू अन मेथिची जूडी ढसाढसा रडली,
वांगे अन बटाटे तर
उकीरड्यावरच सडली. ॥२॥
कोथींबीर अन पालकाला
कोणी पालकच उरला नाही,
मक्याचा दर दरवर्षी पडतो
म्हणून यंदा पेरलाच नाही. ॥३॥
वाल आणि वटाणा
खुडायला आहे महाग ,
व्यापारी अन अडते म्हणजे
आयत्या बिळातील नाग. ॥४॥
भेंडी म्हणते सा-या
जगण्याचीच झाली कोंडी ,
भांडवलदारांनी तर
संसदेचीच केली मंडी ॥५॥
कारले म्हणाले, मी
मूळातच आहे कडू ,
पण एफआरपी साठी
ऊसाच्याही डोळ्यात आहे रडू . ॥६॥
फ्लॉवर अन कोबीकडे
सर्वांनिच फिरवली पाठ,
ढोबळी मिरचीने लावली
उरली – सुरली वाट . ॥७॥
मिरची म्हणाली मी बोलले तर
सरकारला मिरच्या झोंबतील,
आता बळीराजा स्वत:ला टांगुन
घेतोय उद्या तुम्हाला टांगतील .॥८॥
अच्छे दिनाच्या गाजराला
भलताच आला भाव
त्यांच्या शपथा चालू असताना
बळीराजाचा मात्र गेलाय जीव ॥९॥
कधी -कधी वाटतं खुशाल
वेड्या बाभळी उगवू द्याव्यात शेतात,
पिकाला हमीभाव दिल्याशिवाय
पायचं ठेवू नये शेतात. ॥१०॥
श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर
कामोठे, नवी मुंबई.

poem on farmer in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह