poem on farmer life

जगाचा पोशिंदा आणि निसर्ग तोच असे परमेश्वर | 2 Best poem on farmer life

वैशाली पडवळ आणि अर्चना कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on farmer life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

जगाचा पोशिंदा | poem on farmer life

स्पर्धेसाठी स्वरचित कविता
“काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा “
दि. – ३१ ऑगस्ट २०२३
विषय – ” शेतकरी “
काव्यप्रकार – ” मुक्तछंद “
शीर्षक – ” पोशिंदा जगाचा “

जगाचा पोशिंदा | poem on farmer life

रात्र भयाण सरली, पहाट होत आहे…
परी पोशिंदा जगाचा , जग सोडून गेला आहे…!!!

भार जगाचा , वाहत होता सारा…
देह आज त्याचा , दोरीला लटकत आहे…!!!

येतील हजारो , पहा मदतीचे हात…
होते दडून जेव्हा , होता तो हयात…!!!

जीव ओतून कष्ट केले , पण दैवाने ओढून नेले…
काळ्या आईचे मोती सारे , पाण्यामध्ये वाहून गेले…!!!

होती गरज जेव्हा , हात मदतीचे होते मंद…
आज गोळा झाली दुनिया , पण आवाज होता बंद…!!!

माघारी शेतकऱ्यांच्या , कुटुंबाला कोण वाली ??
बुजवून टाका सारी , भ्रष्टाचाराची गलिच्छ नाली…!!!

बंद करा आता , मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं…
शेतकऱ्यांच्या अनमोल कष्टांची , थोडी तरी ठेवा जाणं…!!!

झालं गेलं आता , सगळं ते राहू द्या…
‘बळी’च्या बकऱ्याला , थोडं ‘राजा’सारखं जगू द्या…!!!

____________
©®
✍️वैशाली पडवळ (एंजल वैशू)
अहमदनगर (अ. होळकर नगर)

निसर्ग तोच असे परमेश्वर | poem on farmer life

काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धा, काव्यलतिका
३१/०८/२०२३
विषय: शेतकरी
शीर्षक:- निसर्ग तोच असे परमेश्वर

निसर्ग तोच असे परमेश्वर | 2 Best poem on farmer life

व्यास ऋषींचे शब्द नश्वर
निसर्ग तोच असे परमेश्वर

खरे तेच पूजक ईश्वराचे
करी दाणे हजार एकाचे
जनहित साधण्या तत्पर
निसर्ग तोच असे परमेश्वर..१

पेरणी जणू की नामस्मरण
पीक पुण्य , संपूर्ण वितरण
धन , सन्मान जरी लांबवर
निसर्ग तोच असे परमेश्वर….२

हिरव्या वावरी संगे वावरी
दोघेही शेतकरी नी श्रीहरी
तीच वारी तेथे भजन सुस्वर
निसर्ग तोच असे परमेश्वर….३

व्यास ऋषींचे शब्द नश्वर
निसर्ग तोच असे परमेश्वर

अर्चना कुलकर्णी, ठाणे

जगाचा पोशिंदा आणि निसर्ग तोच असे परमेश्वर | 2 Best poem on farmer life

poem on farmer life

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *