Poem on Father Marathi

बाबा by सौ.समीक्षा जामखेडकर | Best Poem on Father Marathi 2024

सौ.समीक्षा जामखेडकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Poem on Father Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

काव्यबंध समूह आयोजित काव्य लतिका
विषय बाबा/वडील
दिनांक १५/१०/२०२३

बाबा | Poem on Father Marathi

मुलगी झाली म्हणून तूम्ही काही नाराज झाला नव्हता बाबा।
पटकन बाहेर जाऊन तुम्हीच पेढ्याचा पूडा घेऊन आला होता।

आईची माया नेहमी दिसते परंतु तुझ्या न दिसणाऱ्या हळव्या मनाच काय?
सकाळपासून वणवण भटकून आमच्या जेवणासाठी पैसे कमवून आणणारा,
मायेपोटी रागावणार,कडक शिस्त लावणारा परंतु न मागताच सगळ आणून देणारा,
जबाबदारीच्या ओझ्याने बाबा तुम्ही वाकून जातात. तुम्हाला रुसायचा आधिकार नसतोच ना बाबा?

स्वतः फाटके बनियान घालून , पायात तुटकी चप्पल घालून
आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही राब राब राबत असतात बाबा.

बाबा घराचा तू भक्कम पाया आहे।
आई घराचं “मांगल्य” तर तू घराचं “अस्तित्व “आहे बाबा।

अबोल तुझ्या डोळ्यात दिसणार प्रेम नेहमी मला कळत बाबा।
तुझ्या लाडक्या लेकीसाठी तू दुःखात पण नेहमी हसतो बाबा।

बाबा तुझ्यावर लिहिण्यासाठी शब्द कमी पडतात।
म्हणून तर सगळे आईवर कविता करतात।
बाबा माझा सुंदर छान।
बाबा माझा अभिमान ।

सौ.समीक्षा जामखेडकर🙏🙏

बाबा by सौ.समीक्षा जामखेडकर | Best Poem on Father Marathi 2024

बाबा | Poem on Father Marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

बाबा | Poem on Father Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *