Poem on First Love in Marathi 2023

आठवणी | माझे पहिले प्रेम | Best Poem on First Love in Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सुवर्णा पवार यांची -आठवणी- हि कविता -माझे पहिले प्रेम- या विषयावर असून हि एक Poem on First Love in Marathi आहे

आठवणी | Poem on First Love in Marathi

आठवणी | माझे पहिले प्रेम | Best Poem on First Love in Marathi 2023

चाहूल नव यौवनाची
बहरे रुप तारुण्याचे ,
चैत्रपालवी बहरली
खुलवी रूप सौंदर्याचे …….१

कळी उमलली हलके
पाकळी डौलात सारून ,
गंधाळून फिरू लागले
भ्रमर गिरक्या मारून………२

तुझे *माझे पहिले प्रेम*
भाव मोहक उन्मादाचा ,
अधराची ती आतुरता
स्वाद चाखण्या अमृताचा……३

मोहक कलिका फुलली
मजला कळलेच नाही ,
जडले तुझ्यावर प्रेम
तुझ्या नजरेत मी पाही……..४

धुंद आठवांचा पाऊस
रिमझिमतो हा मनात ,
नशिला नटखट वारा
छेडीतो आजही तनात……..५

तुझा स्पर्शाची धुंद जादू
कलिका होती उमलतं,
बेधुंद आसमंत सारा
दाही दिशानी उजळतं………६

मनी फुलल्या होत्या आशा
तुझ्या आणि माझ्या प्रेमानी ,
वृक्षालाही होती फुटली
कोवळी पालवी नव्यानी……७

जुनी आठवण प्रेमाची
पुन्हा पुन्हा येई फिरूनी,
माझे प्रेम तुझ्यावरती
आहे बघ ना रे अजुनी ……..८

गोड तुझ्या त्या आठवणी
दरवळ भरती मनी ,
धुंद वाट जशीच्या तशी
बहरते आजही तनी…………९

झाड बहरले ते सारे
पाखरांच्या थव्या थव्यांनी,
माती अत्तर झाली सारी
उन्हात प्रेम गारव्यांनी …….१०

झुळुक गुलाबी पहाटे
होतो नित्य तुझा आभास ,
अलवार होऊ गंधीत
धुंद भेट तुझीच खास …….११

नकोस छळू असा मला
येऊनीया माझ्या स्वप्नात,
जपले रे अंतापर्यंत
हळुवार या ह्यदयात………१२

न कळत पापणी माझी
आठवणीने ओलावते ,
पहिल्या प्रेमाचा आठवं
चिंबचिंबही भिजवते ………१३

माझ्या मनात आहे आस
भेटण्याची तुला अजुनी,
भेटशील का रे एकदा
सांग तू परत फिरूनी ……..१४

नाही विसरले आजही
प्रेमाच्या धुंद *आठवणी* ,
सख्या आजन्म राहशील
तूच माझ्या सदा जीवनी….. १५

आठवणी | माझे पहिले प्रेम | Best Poem on First Love in Marathi 2023

Poem on First Love in Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

आठवणी | माझे पहिले प्रेम | Best Poem on First Love in Marathi 2023

3 thoughts on “आठवणी | माझे पहिले प्रेम | Best Poem on First Love in Marathi 2023”

 1. माझी शाळा
  हरवली माझी शाळा
  शहरांच्या सुशोभिकरणात
  अभ्यास करू कुठे
  कसा बसू वर्गात
  भरवली होती गुरू जनांनी
  ज्ञान दानाच्या जोमात
  अनेक पाखरे दंग होती
  ज्ञान कण वेचण्यात
  नाकार लेल्यांची गरीबांची
  नापासांची माय
  संत कबीर हायस्कूल
  म्हणजे दुधावरली साय
  आज आवडीन ओढीन शाळा
  पहावयास गेलो खात्रीन
  डोळे भरून आले
  दिसले फक्त मोकळे मैदान
  प्रवीण नारायण मोरे
  म्युझिशियन

  1. तुमच्या कविता प्रसिध्द करायच्या असल्यास तुम्ही 7020965224 वर व्हॉट्स ॲप करू शकता.

 2. सौ.ज्योती कुळकर्णी

  पवार ताईंची पहिल्या प्रेमावरची कविता खूप छान!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *