माझा नातू | Best poem on grandchildren in marathi 2023

माझा नातू | Best poem on grandchildren in marathi 2023

सौ. समीक्षा बाळासाहेब जामखेडकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on grandchildren in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

poem on grandchildren in marathi

काव्यबंध समूह आयोजीत
काव्यलातिका स्पर्धा
विषय आजोबांचा छकुला
दिनांक 14/9/2023

माझा नातू poem on grandchildren in marathi

Best poem on grandchildren in marathi 2023

माझा छकुला तो
तोच माझा सोनूला
माझा नातू नटखट
करतो अदभुत लीला

दुधावरची साय माझी
त्याला मी जपत असतो
मनातलं सारं त्याला मी
मायेने रोज सांगत बसतो

गप्पा गोष्टी ऐकण्यास
नेहमी असतो तो हजर
देखणा असा राजबिंडा
त्याला लागू नये नजर

हात धरून हातात
मला म्हणतो चला
त्याच्या गोड बोलण्यात
आहे वेगळीच कला

माझी काठी, चष्मा
नेहमी जपत असतो
ठेवतो कधी लपून कुठे
विचारल्यावर गालात हसतो

माझ्याविषयी घरात कोणी
बोललेल चालत नाही त्याला
घरी आल्यावर सांगतो हळूच
येवून तो कानात मला

घरात कोणी रागवल्यावर
लपतो येवून माझ्या मागे
त्याच्या मनात असतात
माझ्याबद्दल निस्वार्थी प्रेम धागे

त्याच्यासाठी घरातला एक
प्रेमळ मी असतो मित्र
आजोबा नातवाच किती
सुंदर जमत असतं सूत्र

वेळ नसतो घरात माझ्यासाठी
येवून जवळ कोणी बसत नाही
आजोबा मला बोलत असतात
प्रेमाने विचारता सारखे काहीना काही

हट्ट लाड पुरवतो म्हणून
सारखं मला आणायला सांगतो
रोज बाहेर गेल्यावर मी
त्याला काहीतरी खाऊ आणतो

जीव की प्राण माझा तो
त्याचाही मी जीव की प्राण
आजोबा नातवांच नातं अस
जमतं आमचं सुंदर छान

सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर संभाजीनगर

poem on grandchildren in marathi

poem on grandchildren in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *