रमेश चव्हाण आणि अंकुश कुपले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Best Poem On Life in Marathi
जन्म आणि मृत्यू

काव्यलतिका स्पर्धा
विषय- जीवनगाणे
कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी
जन्म मृत्यू मध्ये वाहते,
जीवनाची ही अखंड सरिता,
नकळे कशी वळणे घेते
थांबत नाही कधी एकदा…
जन्म होतो मायबापाच्या घरी
बालपण सरते खेळ खेळून सारी,
मन रमते आईच्या कुशीत अवघे,
उडून जाती दिनं पाखरू जसे…
मग येतो तारूण्याचा बहर,
मन हे गुंतते मयुरपंखी स्वप्नी,
अवचित येतो सण प्रितीचा तेंव्हा,
हरवते मन बावरे पुन्हा पुन्हा…
पुढे पुढे सरतो आहे ,
कालचक्र हा पूर्ण विरागी,
प्रौढत्वाची फिरे सावली,
मन मात्र रेंगाळे तारूण्याशी…
काळ सांगतो पुढल्या हाका,
आता उरलो थोडाथोडका,
नको रे घालवू मला असा तू
ईश्वरच सखा अपुला खरा ..
नकळत दान पडे वृद्धत्वाचे,
किती राबलो संसारासंगे,
आता जाणवे सगळे खोटे
उरले चिंतन स्वस्वरूपाचे…
ईश्वर साक्षी खराच अपुला,
कळले उशीरा पण शेवटी,
मृगजळ हे नश्वर जीवन,
संपते मृत्युच्या बहुपाशी…
जीवनगाणे मराठी कविता | Best Poem On Life in Marathi 2023
नाना रुपे पर्वांची

काव्यबंध साहित्यिक व्यासपीठ
काव्यलतिका स्पर्धा
विषय-जीवनगाणे
कवयित्री- सौ.वैष्णवी कुळकर्णी
होता अपुला मनुजजन्म प्रारंभते जीवनाचे पर्व |
जाहली अपत्यप्राप्ती म्हणुनी माता पित्यांस होतसे गर्व ||
शैशवाचे पर्व असे मनोहर किती वर्णू तयाची कीर्ती |
नसे कसली विवंचना अन् नसे तमा ती चित्ती ||
तारुण्याचे पर्व गुलाबी असे स्वप्नांनी मोहरलेले |
या पर्वाचे क्षणही असती चैतन्याने बहरलेले ||
येता जीवनी प्रेमपर्व ते रोम रोम जाई शहारूनी |
मुग्ध मिठीत त्या मम प्रेमाच्या येते जीवन बहरुनी ||
संसाराचे गोड पर्व मग मजला साद हळूच देई |
सहजीवनाच्या रम्य पर्वात या मन हरखून जाई ||
येई मग मातृत्वाचे पर्व ते असे ज्याची प्रतीक्षा |
या पर्वात होत असे मग संस्कारांची परीक्षा ||
लवते न लवते नेत्र तोवर पर्व उत्तरायणाचे प्रारंभे |
या पर्वात मग अनुभव शिदोरी रिती होण्यास आरंभे ||
बघता बघता येई नजिक पर्व ते परतीच्या प्रवासाचे |
सुरू होई पुन्हा पर्व मग आयुष्याच्या भास अन् आभासाचे ||
©®वैष्णवी
जीवनगाणे मराठी कविता | Best Poem On Life in Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
जीवनगाणे मराठी कविता | Best Poem On Life in Marathi 2023