चि.रावण अरुण पडवळ आणि शिवाजी वेरुळकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Poem on Life Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
जीवनचक्र ते मरण्याप्रति (जीवन सत्य मृत्यु अटल)….

आयुष्य एक अचानक येणार उलगडत वाऱ्याच उधाण,
त्यात येत असत सुखदुःखाची तुफान,
कमावशील येथपरी अनेक वाटे तू जे धन,
सोबती होणार नाही मेल्यावरी रे ते नेण,
संतुष्ट का नाही अजून सांगना कसे तरी तुझं मन,
समज आता तरी असन्तुष्टी पाई मुश्किल झालं जीन,
वाटावे लोकांपरी आपुल्या कर्माचे सद्गुण,
पुण्य सोबतीचा साठा पाप भोगवी फळे वाईट त्याचे कैसे परिणाम,
मोहाच्या हांडोळ्या फोडल्या जरी किती कसे सुखावतील तुझे र दिन,
मोत्याची ऱ्हास ओतली जरी सामोरी डगमगावे ना आपले कधी चरण,
गुलामी करिसी सोडून ईश्वराची तू ठेवलस स्वतःला स्वार्थापरी गहाण,
मनाची घालमेल चालतसे तुझी कर्म वाईट करिसी कर(हाथ) मनाचीच र मारहाण,
पत्थराला फुटेल कसा रे टाहो न दिसे श्रद्धा भाव तुझ्या र भक्तीन,
हरी म्हणे चिंता ठाई ऐकू कैसे तुझं गाऱ्हाणं,
बहुतेक दिले तुझसी तरी सुटेना रडगाणं,
नाय भेटणार इथं परतीला परत तुला कधी पैसा फेकून वाण,
सुधर आता ठाई मानवा नन्तर ना भेटे वेळेची दान,
हो सावध मानवा ऐकून घे सांगतो महाकाल भक्त काळ्या काळजाचा रावण,
खरच मानवा नकोस र खचू डगमगू सुख दुःख क्षणिक सारी आयुष्य एक अनमोल पुस्तकी पान,
जगण्या धीर घे खचून करू नको घात स्वतःचा येउदे कसलेही व्यवधान,
तोडण्या बंध मोहपाषाचे तू घे नित्य हर-शिवाचे नाम,
जन्माचा जैसा र फेरा मृत्यूचा त्यावर पूर्णविराम,
सोडून दिला भजण्या तू राम मग कैसा पावेल तो हनुमान,
न चुकी न अपराध त्याचा खोट्या इतिहासापाई रावण केला तो बदनाम,
लिहण्यास भरपूर जीवणावरी पण ठेवतो लेखणी थोड्या क्षणाला करून महाकाल देवाला प्रणाम…..!
●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●
◇□◇□◇□◇□◇□◇□◇□◇□◇□◇
नाव:- चि.रावण अरुण पडवळ.
रा:-महा.२०
छत्रपती संभाजीनगर.
मो.8999978782
◇□◇□◇□◇□◇□◇□◇□◇□◇□◇
!! जीवन नव्या आशेचे!! Poem on Life Marathi

आशेचे सुर गात गात आज
इथे येऊन पोहचलो,
का कुणास ठाऊक
कसा मी एवढा मणाने खचलो.. १
रोजच काहीतरी नवीन घडणार, म्हणुन पुढे पुढे चालत आहे,
तीच संध्याकाळ येते नशीबी का कुणास ठाऊक कशे स्वप्न पुर्ण होणार आहे.. २
जिवणाचा हा बोझबारा
असह्य आता वाटत आहे,
घडेल का चमत्कार नवा ,
हा प्रश्न मनात उठत आहे.. ३
काही ही झाले तरी नव्या संकल्पेने सुरुवात ती तर होईलच,
असंख्य मिळतील वाटा आयुष्य सुजलाम सुफलाम् होईलच… ४
शिकावे तर इस्रो सारखे इथ अपयशाला कुठलाच थारा नाही,
कोण थांबवू शकेल मार्ग माझ्या चंद्रयानाचा असा कुठलाही अडथळा या जगात अजुन तरी जन्माला आला नाही.
असा कुठलाही अडथळा या जगात अजुन तरी जन्माला आला नाही …..५
शिवाजी वेरुळकर
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह