Poem on Rain in Marathi

पुष्प तू अन् गंध मी | पावसाळा आणि आठवणी | Best Poem on Rain in Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी भारती राजेंद्र बागल यांची -पुष्प तू अन् गंध मी- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- विषयावर असून हि Poem on Rain in Marathi आहे

पुष्प तू अन् गंध मी | Poem on Rain in Marathi

पुष्प तू अन् गंध मी | पावसाळा आणि आठवणी | Poem on Rain in Marathi 2023

चिंब देह तुझा
नित्य सरींचे कोसळणे
आजही आठवते ग
चोरून पावसात भेटणे


हातात देऊन हात माझ्या
थेंब टपोरे झेलताना
आजही तशीच आठवतेस
चिंब देही बिलगताना

भर दुपारी तळ्यामध्ये
प्रतिबिंब न्याहाळताना
तहानभूक हरपते
पुन्हा तिथे जाताना


नित्य श्वासा श्वासा मधून
स्मृतिगंध दरवळतो
घासा घासा बरोबर मी
विरह वेदना गिळतो

नेत्रकडा ओलावते
पाऊस तो आठवताना
आभाळ कोसळले होते ग
दूर तू जाताना

सुखानंदाचा वर्षाव वाटतो
तुझ्या आठवणीत रमताना

णीव नष्ट होते
तुझ्याशिवाय
जीवनपथ चालताना

कर्तव्य कर्मात मी
आनंदाने रमतो
नित्य जरी मी
तुझ्यासाठी झुरतो

कळ उठते हृदयात
चोरून डोळे टिपतो
पावसाच्या सरीत मग
अश्रूंचा बांध फुटतो

निघून गेला काळ
राहिल्या फक्त आठवणी
प्रीत तरीही तशीच
अजून माझ्या मनी

पुन्हा त्याच सरींबरोबर
खेळ पाठशिवणीचा खेळावा
एकमेकासाठीच वाटते ग
पुनर्जन्म भेटावा


विरहवेदना साऱ्या या
फक्त माझ्यापाशीच राहाव्यात
सुखानंदाच्या सरी
तुझ्या अंगणी कोसळाव्यात

हृदयी फुलावेत तुझ्या
नित्य आनंदाचे मुळे
तुझ्या सुखा वाचून माझे
सुख नव्हे ग वेगळे

पुष्प तू अन गंध मी
न कळले कुणा
दूर करेल कोण ग
सांग आपल्या मना

साक्षीदार वृक्ष
आपल्या भेटीचा
नित्य न्याहाळतो मी
अमूल्य ठेवा आठवणींचा


श्वासांची लय माझ्या
संथ संथ चालते
कधी एकांतात ऐकून पहा
फक्त राधा राधा बोलते

तुझ्या आवडत्या निर्झरापाशी
नित्य मी जातो
रोज नव्याने
वाट तुझी पाहतो

श्रावण सरी खेळायच्या
ऊन पावसाचा खेळ
जसा लपंडावात व्हायचा
तुझा माझा मेळ


सुखदुःख मनातले
कुणाला ग सांगू
पुन्हा तेच दिवस
कितीदा देवाकडे मागू

ओढ्या नदीची खळखळ
तुझ्या अति आवडीची
ठरलेली जागा ती
तुझ्या माझ्या भेटीची

आठवणींच्या ढिगार्‍यात
जीव हा गुदमरतो
स्मशानासम आयुष्यात
मी खळखळून हसतो

माझ्या देह मंदिराची
होती तूच ग पणती
आता फक्त माझी

धार अशी नाती

चिंब देही सौंदर्य तुझे
अधिकच खुलायचे
मंदच चाली सवे तुझ्या
पैंजणही बोलायचे

थेंब टपोरे घेऊन देही
तुझे झुल्यावर झुलणे
प्रिय वाटायचे सखे
जसे मोगऱ्याचे फुलणे

झाडावेली मधुनी
टप टप टपोऱ्या थेंबांची
आजही आठवते
उबदार लई श्वासांची


गोड वाटायचा तो पाऊस
एकांतात एक होता ना
विसरायचे देहभान
नृत्य मयूराचे पाहताना

नभ दाटून येता
हुरहुर मनी दाटायची
बंधनांची बेडी
अलगद तुटायची

पंडितल्या पाऊलवाटा
डोळे झाकून तुडवायचो
कितीही मार खाल्ला जरी
पुन्हा तिथेच भेटायचो


किती किती रमू ग
आठवणींच्या सागरात
फुल एकटेच फांदीवर
गंध उडाला आकाशात

संपेल आयुष्य जरी
ना संपतील आठवणी
फुलवग सखे पुन्हा
प्रीत माझ्या जीवनी


कृष्णाचा बिलगते
जशी ग बासरी
सोबत असावी वाटतेस
राधा तू हसरी

पुष्प तू अन् गंध मी | Poem on Rain in Marathi

पुष्प तू अन् गंध मी | Poem on Rain in Marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *