सैनिकाची पत्नी | Best Poem on Soldier’s Wife in 2024

प्रविण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Poem on Soldier’s Wife in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Poem on Soldier’s Wife in 2024

काव्यबंध समूह आयोजित, काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा.
दिनांक :- 25/2/2024
विषय :- सैनिकासाठी कविता..

सैनिकाची पत्नी | Poem on Soldier’s Wife in 2024

माझ्यापासुनी दूर तुम्ही
मातृभूमीच्या रक्षणासाठी
तळमळतोय माझा जीव
तुमच्या एका भेटीसाठी…1

दहशतवाद्यांच्या हल्ल्याची
येते बातमी जेव्हा कानी
धडधड करत काळीज माझं
अनेक विचार येतात मनी….2

ऐकते मन लावून आठवणीत
फौजी तुमच्या आवडीची गाणी
लागलेत तुमच्याच वाटेकडे डोळे
आठवण येते तुमचीच क्षणोक्षणी..3

कधी नाही लागला फोन तुमचा
जीव होतो माझा वर खाली
खूप काळजी असते तुमची फौजी
कळवत जावा तुमची खुशाली…4

कधी येणार साहेब तुम्ही
वाट बघते मी पाखरावानी..
बोलताना तुमच्याशी फौजी
लपविते डोळ्यातील पाणी…5

करताय तुम्ही देशाची सेवा
वाटतो मला सार्थ अभिमान
नशीब माझे थोर म्हणून
लाभला तुमची पत्नी होण्याचा मान..6

राहता सीमेवरती तुम्ही उभा
म्हणून आम्ही आहे सुरक्षित..
देशप्रेमासोबत हृदयात तुमच्या
माझं पण प्रेम राहू द्या आरक्षित…7

काळजात होतात वेदना माझ्या
सीमेवरती साहेब तुम्ही लढताना..
कसं समजावू सांगा फौजी
लेकरू’ पप्पा ‘म्हणून रडताना…8

लय भारी वाटतं आम्हाला साहेब
सीमेवर दहशतवाद्यांची जिरवताना
अभिमान वाटतो मला स्वतःला
फौजींची पत्नी म्हणून मिरवताना…9

कुटुंबाचा विचार न करता
लढता तुम्ही रात्रंदिवस
सुखी ठेव धनी कुंकवाचा
हाच माझा भारतमातेला नवस…10

*प्रविण मारुती कसबे*
*माळशिरस_ सोलापूर*

Poem on Soldier’s Wife in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *