poems for granddaughters from grandparents 2023

आजी आणि नात | Best poems for granddaughters from grandparents 2023

उज्वला सहस्रबुद्धे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poems for granddaughters from grandparents विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

poems for granddaughters from grandparents

काव्य बंध समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धा
विषय -आजी आणि नात
दिनांक – 14-9-2023

आजी आणि नात | poems for granddaughters from grandparents

आजी आणि नात | Best poems for granddaughters from grandparents 2023

आजी आणि नातीचे
नाते असते नाजूक!
दुधावरची साय म्हणून
असते अगदी साजूक!

स्नेह ओथंबून वाहत राहतो,
आजीच्या हातातून!
मायेची साय साखर मिळते
नाती नाही त्यातून!

खरबरीत जरी असला,
आजीचा स्पर्श जरी!
मायेची तार जाई,
आतूनच ती खरी!

लुटुपुटुच्या भातुकलीत,
असते पाहुणी आजी!
नातीच्या स्वयंपाकात,
निवडत बसते भाजी!

बोलता बोलता शिकवते,
नातीला संसाराचे धडे!
नातीला ते समजत नाही,
पण कान ठेवी उघडे!

मोठी होऊन नात,
गुंतून जाईल संसारी!
आजीचा आठव येईल,
मनात तिच्या सासर घरी!

उज्वला सहस्रबुद्धे
पुणे

Best poems for granddaughters from grandparents 2023

poems for granddaughters from grandparents

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *