वर्षा पडधान / खोब्रागडे, मंगल राजाराम यादव आणि नेत्रा शेट्टी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Poems on Life in Marathi Font विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Poems on Life in Marathi Font
काव्यबंध समुह आयोजित कविता स्पर्धा
दिनांक 1/10/2023
विषय – आयुष्य
पांढय्रा पायाची (विधवा स्त्री च्या भावना) | Poems on Life in Marathi Font

मेलेल्या भावनांचा
डोळ्यात पूर वाही
थिजलेल्या मनाला
वाट सुचत नाही ।
गेल्या सरून बाता,
वळून वाट ही ती गेली
परतून का तरीही
क्षण माग घेत राही।
रूजलेत आठवांचे
धागे मनात खोल
हा दाह पापण्यांच्या
कडां मधून वाही।
मी शोधतेय तारा
निरभ्र जरी आकाशी
मनातल्या ग्रहणाचा
मज थांग लागत नाही।
ती एक ओळ माझी,
पुरे पान कोरे होते
स्वरचिन्हे जरी नव्हती
तरी शब्द सुचले नाही ।
कोणी ना कुणाचा
आधार शेवटाचा
नजरेत प्रश्न पुसती
जनू मीच तुच्छ काही ।
जनू बाट लागलेली
ही जात वेगळीच
नशीबातल्या दुःखाचा
भोग माझ्या ठायी।
श्वेत वस्त्र जरी बदलले
तरी रंग जगण्यातले उडाले
पांढय्रा पायाची हा शब्द
पुसल्याच जात नाही।
कवयित्री:- वर्षा पडधान / खोब्रागडे
Poems on Life in Marathi Font
काव्यबंध समूह आयोजित, काव्यलतिका
साप्ताहिक स्पर्धा.
दि.१/१०/२०२३.
विषय- आयुष्य.
सुंदर आयुष्य | Poems on Life in Marathi Font

प्रत्येकाचे आयुष्य वेगळे,
जगण्यातील अनुभव निरनिराळे,
आयुष्य असावे सुंदर छान,
नशीब घडते आगळेवेगळे…१
नको असतात ताणतणाव,
भांडण,तंटा, वाईट सवयी,
परिस्थिती घडविते उधळण,
कार्य करण्या उसळते रक्त अवयवी…२
रोजची नवी आव्हाने पेलताना,
बसतात सुखदुःखाचे चटके,
शांत बसणे असते निष्क्रियता,
आयुष्य असते का नीटनेटके?..३
गरीब -श्रीमंत,राव नि रंक,
घडतात संत शूरवीर थोर महात्मे,
वाचून पहा त्यांचे आयुष्य,
होते का? ते सहज सोपे रत्ने…४
जीवन चालते चढ उतार दुःखाचे,
होते आयुष्याची होरपळ,
तरीही आयुष्य हवे असते,
नवीन अनुभवासाठी करतात पळापळ…५
जाण असू दे दुसर्यांच्या भावभावनांची,
आचार,विचार,बोल आपले गोड देणं,
दानाचे व ज्ञानाचे महत्व जाणूनी,
समाजाचं जपून सुंदर लेणं…६
जपून टाक वर्तमानाची पाऊले,
चिंता मिटतील पदोपदी,
सदाचार ठेव कृती मध्ये,
सुंदर आयुष्य खरोखरी…७
मंगल राजाराम यादव.
शिराळा जि.सांगली.

Poems on Life in Marathi Font
काव्यबंद समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा.
रविवार दि. १/१०/२०२३
विषय – आयुष्य
आयुष्य | Poems on Life in Marathi Font

कठीण कठीण म्हणण्यापेक्षा
सोप्पे जरा करून पाहा
सुंदर आहे आयुष्य
सुंदररीत्या जगत राहा
दुःख संकट घालून सांगड
असतात उभी दाराशी
सोडवूनी त्यातील गुंता
मागे त्यांना टाकत राहा
सुंदर आहे आयुष्य…..
क्षणिक असते सुख
दुःख पर्वतावर एवढे
पण असते तिथेही पायवाट
फक्त तु शोधत राहा
सुंदर आहे आयुष्य…..
प्रसंग असो चांगला वाईट
उभी आसवे नयनांमधी
न पुसता त्या आसवांना
उंच भरारी घेत राहा
सुंदर आहे आयुष्य…..
नका पळू आयुष्यामागे
मृगजळा प्रमाणे
रस पिऊनी त्यातील सारा
सुंदर वटवृक्ष हा वाढवा
सुंदर आहे आयुष्य…..
काळी सावली असती आयुष्यामधी
भूतकाळातील वेचून आनंदी क्षण
बाकी सारे तू पुसत राहा
भविष्य आपले घडवूनी
वर्तमान तू जगत राहा
सुंदर आहे आयुष्य…..
नेत्रा शेट्टी✍🏻
सातारा🌹🌹🌹🌹🌹🌹

Poems on Life in Marathi Font
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह